UP Crime News  Saam TV
देश विदेश

Reel Star Arrested : दिवसा बनावायचे रील्स, रात्रीच्या अंधारात करायचे नको ते काम; लाखो फॉलोअर्स असलेल्या २ रील स्टार्सना अटक

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News :

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स एखाद्या सेलिब्रिटीसारखी लाईफ जगतात. जिथे जातील तिथे फॅन्स त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. मात्र इन्फ्लुएन्सर्सना चोरीच्या घटनेत अटक केल्याचं सांगितलं तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र अशी घटना उत्तर प्रदेशच्या बहराइच येथे घडली आहे. (Latest Marathi News)

दोन इन्फ्लुएन्सर्सना पोलिसांनी सळई चोरी केल्याच्या गुन्ह्यातअटक केली आहे. साहिल आणि फरहान अशी अटक झालेल्या दोन इन्फ्लुएन्सर्सची नावे आहेत. दोघेही प्रसिद्ध रील स्टार आहेत. दोघांचेही इन्स्टाग्रामवर लाखोंमध्ये फॅन्स आहेत.

कॉमेडी रिल्स बनवण्यासाठी दोघेही प्रसिद्ध आहेत. दोन्ही इन्फ्लुएन्सर्सनी ४५ क्विंटल सळई चोरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बहराइच जिल्ह्यात भारत सरकारच्या 'जल जीवन मिशन प्रकल्पा'चं काम सुरु आहे. घरोघरी पाणी पोहोचवण्याची ही योजना आहे. या कामासाठी GVR कंपनीने परिसरात एका मोठं गोदाम उभारलं आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात रॉड, सळई आणि पाईप ठेवण्यात आले आहेत.

मात्र मागील काही दिवसांत गोदामातून सळया चोरीच्या तक्रारी येत होत्या. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे गोदामाचे सुरक्षा कर्मचारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी परिसरातील इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले साहिल उर्फ ​​सुफियान आणि फरहान या दोन इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सना अटक केली. इतर आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT