

प्रत्येकालाच त्याच्या कमाईतले पैसे जमा करून भविष्यात मोठा लाभ मिळवायचा असतो. यासाठी FD हा ऑप्शन बरेच लोक निवडतात. पण ज्या बँकेत पैसे ठेवलेले आहेत ती बँक आर्थिक अडचणीत आली किंवा बँक बंद पडली तर आपल्या ठेवींचं काय होतं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा परिस्थितीमध्ये DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) च्या नियमांची माहिती असणं महत्त्वाचं आहे.
समजा, तुमची एखाद्या बँकेत १० लाख रुपयांची FD आहे आणि संबंधित बँक अपयशी ठरली. अशावेळी संपूर्ण १० लाख रुपयांवर DICGCचे ५ लाख रुपयांचं विमा संरक्षण लागू होत नाही. मूळ रक्कम आणि व्याज मिळून जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंतच विमा संरक्षण लागू होतं. उर्वरित रकमेवर ही विमा सुरक्षा लागू होत नाही.
एकाच बँकेत २ ते ३ वेगवेगळ्या FD केल्याने स्वतंत्र ५ लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळत नाही. उदाहरणार्थ एका बँकेत बचत खात्यात ४ लाख, एका FDमध्ये ५ लाख आणि दुसऱ्या FDमध्ये ३ लाख रुपये असतील, तर विमा कवर ठरवताना या ठेवी सामान्यत: एकत्रित विचारात घेतल्या जातात. तसेच एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे ठेवल्यानेही स्वतंत्र कवर मिळत नाही.
त्यामुळे FD करताना फक्त व्याज पाहू नका. संबंधित बँर DICGCच्या विमा योजनेअंतर्गत आहे का, तसेच ५ लाखांची मर्यादा मूळ रक्कम आणि व्याजासह लागू होते, हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.