PM Awas Yojana : घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! ₹8 लाखांच्या लोनवर मिळणार इतकी व्याजाची सवलत

Sakshi Sunil Jadhav

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत सुमारे १ कोटी शहरी कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्याचे सरकारचं उदिष्ट आहे.

PMAY 2.0

₹१० लाख कोटींची तरतूद

प्रधानमंत्री आवास योजना या योजनेसाठी सुमारे १० लाख कोटींची तरतूद असून केंद्र सरकारकडून २.३० लाख कोटींची थेट मदत दिली जाणार आहे.

PMAY home loan subsidy

घर बांधायला मदत

स्वत:ची जमीन असलेल्या पात्र कुटुंबांना पक्क घर बांधण्यासाठी केंद्राकडून १.५० लाखांपर्यंतची मदत मिळू शकते.

home loan interest subsidy

जमीन नसली तरी पर्याय

स्वतःची जमीन नसलेल्या पात्र EWS कुटुंबांसाठी सरकारकडून परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे.

home loan interest subsidy

भाड्याने राहणाऱ्यांसाठीही योजना

प्रवासी, औद्योगिक कामगार, कामकाजी महिला आणि शहरी गरीबांसाठी परवडणाऱ्या भाड्याच्या घरांची सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.

home loan interest subsidy

होम लोनवर ४% व्याज सवलत

पात्र लाभार्थ्यांना ₹८ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर वार्षिक ४% व्याज अनुदानाचा लाभ मिळू शकतो.

home loan interest subsidy

कमाल ₹१.८० लाखांपर्यंत फायदा

गृहकर्जावरील व्याज अनुदानामुळे पात्र लाभार्थ्यांना एकूण ₹१.८० लाखांपर्यंतचा लाभ मिळण्याची तरतूद आहे.

PMAY home loan

उत्पन्नाची मर्यादा महत्त्वाची

योजनेत ₹३ लाखांपर्यंत, ₹३ ते ₹६ लाख आणि ₹६ ते ₹९ लाख वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंबीय आय-वर्ग समाविष्ट आहेत.

government housing scheme

NEXT : डार्क चॉकलेट की चॉकलेट्स आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर? वाचा...

dark chocolate iron
येथे क्लिक करा