Chinese Army Enter Inside Arunachal Pradesh Saam Tv
देश विदेश

Fact Check: अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किमी आत घुसले चिनी सैन्य, काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य?

Chinese Army Enter Inside Arunachal Pradesh: चिनी सैन्य भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये घुसल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओमागचं खरं सत्य समोर आलं आहे.

Priya More
  • अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैन्य ६० किमी आत घुसल्याचा दावा

  • चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसल्याचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत

  • चीनने भारताचा भूभाग ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल

  • व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य आलं समोर

भारत-बांगलादेश सीमेवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सीमेवरील सध्याची परिस्थिती दाखवण्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओबाबत अनेक दावे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशात ६० किलोमीटर आत घुसून भारतीय भूभाग ताब्यात घेतल्याचा दावा या व्हिडीओद्वारे केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक भारतीय नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे?, त्या मागचं सत्य काय आहे? हे आपण आज जाणून घेणार आहोत...

व्हायरल व्हिडिओची पडताळणी केल्यावर असं सत्य समोर आले आहे की, हा व्हिडीओ जुना आहे. तो अलीकडील घटनेच्या संदर्भात शेअर करणे चुकीचे असल्याचे समोर आले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनेही या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकनुसार, भारत-बांगलादेश सीमा भागाशी संबंधितचा हा व्हिडिओ जुना आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली घटना अलीकडची नाही. हा व्हिडीओ जुना असताना देखील तो आता शेअर करून लोकांची दिशाभूल केली जात आहे आणि त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर असा समज निर्माण झाला की, त्यामध्ये दाखवलेली घटना भारत-बांगलादेश सीमा भागात नुकताच घडली आहे.

पीआयबी फॅक्ट चेक करत लोकांना अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशाप्रकारचे व्हिडीओ किंवा फोटो कुणी केलेल्या दाव्यामुळे त्याची पडताळणी न करता शेअर करू नये. नागरिक यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आजकाल जुने फोटो आणि व्हिडिओ नव्या घडामोडींशी जोडून शेअर करणे ही चुकीची माहिती पसरवण्याची एक सामान्य पद्धत आहे. भारत-बांगलादेश सीमेसारख्या संवेदनशील विषयाशी संबंधित मजकूर शेअर करण्यापूर्वी त्याचा स्रोत आणि संदर्भ पडताळून पाहणे योग्य राहिल. अशाप्रकारचे व्हिडीओ आणि फोटो पडताळणी न करता पुढे फॉर्वर्ड करणे हे चुकीचे राहिल आणि यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

तथ्य तपासणीत असे दिसून आले की, व्हायरल झालेला व्हिडिओ खूपच जुना आहे. भारत-बांगलादेश सीमेवरील ही एक अलीकडील घटना असल्याचे भासवून तो शेअर केला जात आहे जे अत्यंत खोटे आहे. सोशल मीडिया युजर्सला असा सल्ला दिला जातो की, अशा व्हिडिओंवरून कोणताही निष्कर्ष काढू नका किंवा पडताळणी न करता तो इतरांना शेअर करू नका. अशा प्रकारच्या खोट्या व्हिडीओला बळी पडू नका. पडताळणी करून तुम्ही तो व्हिडीओ पुढे इतरांना पाठवू शकता. पण सत्य न तपासता तो व्हिडीओ पुढे पाठवणे गंभीर बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंचायतराज समितीकडून अकोला जिल्हा परिषदेची झाडाझडती

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

SCROLL FOR NEXT