Uttar Pradesh Crime Saam tv
देश विदेश

Crime: अनैतिक संबंधातून महिलेचे भयंकर कृत्य, ७ महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या नंतर...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये महिलेने आपल्या सात महिन्याच्या बाळाची हत्या केली. त्यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांना देखील संपवण्याचा कट रचला होता. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली.

Priya More
  • मेरठमध्ये एका महिलेने आपल्या ७ महिन्यांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली

  • आरोपी महिलेने मुलाचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे सांगितले

  • चौकशीत महिलेने प्रियकरासोबत पती आणि सासरच्यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली

  • पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिचा प्रियकर फरार आहे

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भयंकर हत्याकांडाची घटना घडली. आईने आपल्या सात महिन्यांच्या मुलाची हत्या केली. ही घटना मुंडाली परिसरात घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे, महिलेने आपल्या सासरच्यांच्या हत्येचा देखील कट रचला होता. प्रियकराच्या मदतीने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनाक्षी असं आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेने आपल्या सात महिन्यांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. तिने आपला दुसरा मुलगा, नवरा आणि सासरच्यांना संपवण्याचा कट रचला होता. मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिने केला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी मुलावर अंत्यसंस्कार केले. त्याचा मृतदेह त्यांनी जमिनीत पुरला. पोलिस आता तो मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवणार आहेत.

मुरलीपूर गावातील रहिवासी अमित तोमर यांनी आपल्या सात महिन्यांच्या रुद्रांश या मुलाच्या हत्येचा आरोप पत्नी मीनाक्षीवर केला. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मीनाक्षीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मीनाक्षीने आपल्या मुलाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा सांगितले होते. पण पोलिस चौकशीदरम्यान तिने आणखी धक्कादायक कबुली दिली.

तिने संपूर्ण कुटुंबीयांना संपवण्याचा कट रचला होता. मीनाक्षी आणि तिच्या प्रियकराने दुसऱ्या मुलाची आणि अमितसह सासरच्या इतर सर्वांची हत्या करण्याचा कट रचला होता. ते सर्वांना विष देऊन मारण्याचा प्लान करत होते. पोलिसांनी मिनाक्षी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. मिनाक्षीला पोलिसांनी अटक केली. पण तिचा प्रियकर फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी मिनाक्षीचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : शिवीगाळीचा जाब विचारणे पडले महागात; कल्याणमध्ये महिलेसह मुलीला आणि दुकानदाराला मारहाण

Late Night Eating: रात्री ८ नंतर जेवल्याने खरंच वजन वाढतं? जाणून घ्या 'या' ७ महत्त्वाच्या टिप्स

Maharashtra News Live Update: पुणे-बेंगळुरू महामार्गावर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक

Dark elbow and knee : कोपर-गुडघ्यांचा काळेपणा कमी करायचाय? स्किन केअरमध्ये या ६ गोष्टी नक्की करा

22k Gold Mangalsutra: लाडक्या बायकोसाठी 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT