चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. हाती आलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस विजय होत असल्याचं दिसत होतं. परंतु आज आलेल्या निकालामुळे काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडाली आहे. तर भाजपच्या कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्याचबरोबर या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या तरीही त्यांचा पराभव होत असल्याचं दिसत आहे. यावेळी भाजपने कोणती रणनीती आखली आणि विजय खेचून आणला, हे जाणून घेऊ.(Latest News)
चार राज्यांपैकी तीन राज्यात काँग्रेसचा पराभव होत असल्याचं दिसत आहे. याचदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया I.N.D.I.A आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवलीय. विजयाची आस धरून ठेवलेल्या काँग्रेसला तीन राज्यात पराभव स्वीकारावा लागलाय. त्याचवेळी भाजपने योग्य रणनीती आखत या राज्यात विजय मिळवला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मध्य प्रदेशात एकूण २३० जागा असून, त्यापैकी १६४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेस ६३ जागांवर पुढे आहे. राजस्थानमध्ये २०० जागांपैकी १९९वर मतदान झालं. यात १०९ पेक्षा जास्त जागांवर भाजपने आघाडी घेतलीय. तर काँग्रेस ७४ जागांवर आघाडीवर आहे. तर छत्तीसगडमध्ये सुद्धा भाजप आघाडीवर आहे. मध्यप्रदेशात भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळालं आहे. तर राजस्थानमध्ये भाजप पाच वर्षानंतर पुन्हा सत्तेत येत आहे. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत छत्तीसगडमध्येही भाजपने चांगली कामगिरी केलीय. याचमुळे भाजपच्या रणनितीची चर्चा सध्या रंगू लागलीय.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी काही महिन्यांपूर्वीच राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तिकीटांचं वाटप केलं. पण मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलं नाही. भाजपने २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, आणि छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केल्यानं भाजपचा पराभव झाला. ही चूक डोक्यात ठेवत भाजपने यावेळी मुख्यमंत्री कोण असणार याची घोषणा केली नाही.
भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील निवडणूक थेट राष्ट्रीय मुद्द्यावर केली. अनेक केंद्रीय मंत्री, खासदारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. परंतु सर्व ठिकाणी होणाऱ्या प्रचारात मात्र पंतप्रधान मोदी हेच मुख्य आकर्षक राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अनेक प्रचार सभा घेतल्या. या सभेत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारची कामगिरी जनतेसमोर मांडली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ग्राउंड स्तरावर निवडणूक प्रचारावर नियंत्रण ठेवले होतं. मायक्रो स्तरावर प्रचाराची रणनीती ठरवली. हीच जमेची बाजू ठरली. मध्यप्रदेशात केंद्रीय नेत्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची जनआशीर्वाद यात्रेने राज्यातील वातावरण तापवलं. भाजपच्या नेत्याने या कामगिरीविषयी सांगताना सांगितले की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांविषयी केलेल्या योजना लोकप्रिय झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजपचे माजी अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांनी संघटना बांधली, असल्याचं भाजप नेत्यानं सांगितलं.
गरीब कुटुंबांना ५०० रुपयेमध्ये गॅस सिलिंडर देणे आणि विवाहित महिलांना प्रतिवर्षी १२,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वसन मोदींनी दिले होते. मोदींच्या या आश्वासनांचा सकारात्मक परिणाम झाला. पंतप्रधान मोदींची आश्वासने असल्याने लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.