Chhattisgarh, Telangana Assembly Election 2023 Results LIVE: तेलंगणात काँग्रेसचा १० जागांवर विजय

Chhattisgarh, Telangana Assembly Election 2023 Results Live Updates: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज म्हणजे ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. या राज्यात कुणाचे सरकार येणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.
Chhattisgarh, Telangana Assembly Election 2023 Results
Chhattisgarh, Telangana Assembly Election 2023 Results Saam TV
Published On

Telangana Assembly Election 2023: मोदींनी तेलंगणाच्या जनतेचे मानले आभार 

Chhattisgarh Election Result 2023 :छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे कवासी लखमा विजयी

कोंटा विधानसभामधील काँग्रेसचे उमोदवार कावासी लखमा विजयी झाले आहेत. कावासी लखमा १९८१ मतांनी विजयी झाले आहेत. कावासी लखमा यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला आहे.

Telangana Assembly Election :तेलंगणामध्ये भाजपचे खातं उघडलं; एका जागेवर विजय

तेलंगणामध्ये अखेर भाजपने आपलं पहिलं खात उघडलं आहे. अरमूर मतदारसंघात भाजपच्या राकेश रेड्डी यांनी ३० हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना ७२ हजारांहून अधिक मते मिळाली आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणात काँग्रेसचा १० जागांवर विजय

तेलंगणात काँग्रेस विजयाकडे वाटचाल करत आहेत. तेलंगणात काँग्रेसने दहा जागांवर विजय मिळवून आघाडी कायम ठेवली आहे. तर बीआरएस सहा जागांवर विजयी झाले आहे. भाजपने आठ जागांवर विजय मिळवला आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये भाजपचे रामकुमार टोप्पे यांचा विजय

छत्तीसगडमध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये सीतापूर विधानसभेतून भाजपचे रामकुमार टोप्पे १८ हजार मतांनी विजयी झाले आहे. भाजप ५५ मतदारसंघात आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३३ जागांवर पुढे आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची आघाडी

छत्तीसगडमध्ये मतमोजणीची तेरावी फेरी सुरु झाली आहे. यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आघाडी घेतली आहे. भूपेश बघेल जवळपास १४ हजार मतांनी पुढे आहेत.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणात बालकोंडामध्ये बीआरएसचा विजय

तेलंगणात बालकोंडा मतदारसंघात बीआरएसचे प्रशांच रेड्डी वेमुला यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी ७०,४१७ मते मिळाली आहे. तर काँग्रेसच्या सुनिल कुमार यांना ६५,८८४ मते मिळाली आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये भाजप विजयाच्या मार्गावर- अरुण साओ

छत्तीसगडमध्ये भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. यावर भाजप खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अरुण साओ म्हणाले की, त्तीसगडमध्ये जो कोणी जनतेच्या कष्टाने कमावलेला पैसा लुटतो त्याला तुरुंगात पाठवले जाईल. काहीही झाले तरी कोणालाही सोडले जाणार नाही.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणात काँग्रेसला आणखी दोन जागांवर विजय

तेलंगणात काँग्रेसने चांगलीच बाजी मारली आहे. त्यामुळे जवळपास काँग्रेस विजयी होईल असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी वर्तवला आहे. तेलंगणात हुजूरनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उत्तम कुमार रेड्डी निवडून आले आहेत. तर चेन्नूर मतदारसंघातून गड्डाम विवेकानंद यांनी विजय मिळवला आहे.

Telangana Assembly Election 2023:  तेलंगणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या निवास्थानी सुरक्षा वाढवली

तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या निवास्थानी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आघाडीवर; रमण सिंह राजनादगांवमधून विजयी

पाटन विधानसभेतून मुख्यमंत्री भूपेश बघेल आघाडीवर आहेत. तर त्यांच्या भाजपचे विजय बघेल पिछाडीवर आहेत. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे राजनादगांव मतदारसंघातून विजयी झाले आहे.

Telangana Assembly Election 2023 :रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; विकीपीडियाची घोषणा

रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा विकीपीडियाने केली आहे. रेड्डी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने नवी विजय मिळवला आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये दोन जागांवर काँग्रेसचा विजय

तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तब्बल ६४ जागांवर काँग्रेस बाजी मारत आहे. जुक्कल आणि मेडक या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये मतमोजणीची १० वी फेरी सुरु; भाजपची आघाडी

भाजपच्या बेमेतरा विधानसभेच्या मतमोजणीची १०व्या फेरीला सुरुवात झाली आहे. भाजपचे उमेदवार ४३०६ मतांनी पुढे आहेत. तर साजा विधानसभेत कॅबिनेट मंत्री रविंद्र चौबे ६२०४ मतांनी मागे आहेत. नवागढ विधानसभेत भाजपचे दयालदास बघेल ८०२७ मतांनी पुढे आहेत तर मंत्री गुरु रुद्र कुमार पिछाडीवर आहेत.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये काँग्रेसचे रेवंत रेड्डी आघाडीवर; मुख्यमंत्री केसीआर पिछाडीवर

तेलंगणामध्ये कामारेड्डी मतदारसंघात सध्या काँग्रेसचे रेवंत रेड्डी आघाडीवर आहेत. ते १७६८ मतांनी पुढे आहेत. सध्या तेलंगणात काँग्रेस ६३ जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; भाजपने केला बहुमताचा आकडा पार

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभेत भाजपने एकूण ५४ जागेवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ३३ जागांवर आघाडीवर आहे.

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणात काँग्रेसच्या जल्लोषाला सुरुवात; रेवंत रेड्डी यांचा रोड शो

तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या घराबाहेर रोड शो करण्यात येत आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये महत्त्वाच्या जागांवर कोणाची बाजी?

जगदलपूर विधानसभेत भाजपचे किरण देव १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

चित्रकोट विधानसभेत भाजपचे विनायक गोयल ७ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

कोंटा विधानसभेत काँग्रेचे कावासी लखमा १२७१ मतांनी पुढे आहेत.

केशकल विधानसभेत भाजपचे आसाराम नेताम ४५४५ मतांनी आघाडीवर आहेत.

अंतागड विधानसभेत भाजपचे विक्रम उसेंडी २० हजार मतांनी पुढे आहेत.

Telangana Assembly Election 2023: बीआरएसचं स्वतःच्या राज्याकडे दुर्लक्ष - शरद पवार

तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. तेलंगणामध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. बीआरएसचं स्वतःच्या राज्याकडेच दुर्लक्ष झालं. अर्थात, या चार राज्यांमधील निकालाचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही, अस ते म्हणाले.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या घरी

तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष बाजी मारताना दिसत आहे. नुकतेच तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार आणि इतर पोलिस अधिकारी काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांची घरी पोहचले आहेत. तेलंगणात एक ११९ जागांसाठी लढत सुरु आहे. त्यातील ६७ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांचा रोड शो

तेलंगणात काँग्रेसची आघाडी आहे. काँग्रेस ६५ जागांवर पुढे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी रोड शो आयोजित केला आहे.

Telangana Assembly Election 2023: 'तेलंगणातील जनतेने उत्तर दिले आहे'; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार

तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसचं सरकार येईल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी वर्तवला आहे. उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनीही काँग्रेस विजयी होईल असं म्हटलं आहे. "तेलंगणातील जनतेने ठरवले आहे की बदल व्हायलाच हवा. प्रगती आणि विकासासाठी बदल झालाच पाहिजे. ते (रेवंत रेड्डी) पीसीसीचे अध्यक्ष आहेत. ते टीम लीडर आहेत. आमचा पक्ष निर्णय घेईल. निवडणूक सामूहिक नेतृत्वावर लढली गेली. मी केसीआर किंवा केटीआरवर भाष्य करू इच्छित नाही, तेलंगणातील जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव पिछाडीवर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री मागे पडले आहेत. छत्तीसगडमधील अंबिकापूर मतदारसंघातील टीएस सिंह देव पिछाडीवर आहेत. अंबिकापूर मतदारसंघातून ३६६ मतांनी पिछाडीवर आहेत. भाजपचे राजेश अग्रवाल पुढे आहेत.

Telangana Assembly Election 2023: काँग्रेस तेलंगणात सरकार स्थापन करत आहे; मंत्री शरणप्रकाश रुद्रप्पा

काँग्रेसचे नेते शरणप्रकाश रुद्रप्पा यांनी तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचा विश्वास दर्शवला आहे. 'काँग्रेस सरकार स्थापन करत आहे आणि आम्ही कदाचित 70 पेक्षा जास्त जागा जिंकत आहोत. काँग्रेस एकजूट आहे आणि प्रयत्नांनी, काँग्रेस तेलंगणात पुन्हा सत्तेत आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला निश्चितच झटका आहे.' असे ते म्हणाले.

Chhattisgarh Election Result 2023 :छत्तीसगडमध्ये ओपी चौधरी १८ हजार मतांनी आघाडीवर

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात जाली आहे. रायगढ विधानसभेतून ओपी चौधरी तब्बल १८ हजार मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर; काँग्रेस पिछाडीवर

छत्तीसगडमध्ये भाजप पुढे जाताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली आहे.. भाजप एकूण ५२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणात काँग्रेसची आघाडी कायम

तेलंगणात काँग्रेस आघाडी वर असल्याचे दिसत आहे. काँग्रेस ६८ जागांवर आघाडीवर आहेत. बीआरएस ३९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजप फक्त ९ जागांवर पुढे असल्याचे दिसत आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी वर्तवला आहे. त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात नाचत जल्लोष करताना दिसत आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये कानारेड्डी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री केसीआर आघाडीवर

तेलंगणामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पाचव्या फेरीत मुख्यमंत्री केसीआर ६६० मतांनी आघाडी घेतली आहे. कामरेड्डी विधानसभा त्यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये काँग्रेस नेते रेवंत रेड्डी २५८५ मतांनी आघाडीवर होते. आता मुख्यमंत्री केसीआर यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे.

Telangana Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास; भाजप नेते रमण सिंह

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी आजचा दिवस छत्तीसगडसाठी अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. आपले सरकार स्थापन होणार आहे हे मला आधीच माहीत होते. येथे भाजपच पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास आहे. भूपेश बघेल यांना राज्यातील जनतेने नाकारले आहे. भूपेश बघेल सरकारमध्ये भ्रष्टाचार होता.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक

तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी वर्तवला आहे. त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या पोस्टरवर दुधाने अभिषेक केला आहे.

Telangana Assembly Election 2023:

तेलंगणामध्ये भाजप सध्या ९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६६ जगांवर आघाडीवर दिसत आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासह ७ मंत्री पिछाडीवर

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भुपेश बघेल पिछाडीवर, सुरुवातीच्या कलांमध्ये ७ मंत्री देखील मागे

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर

छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा आघाडीवर दिसत आहे. काँग्रेस सध्या ५० जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजप ४० जागांवर पुढे आहे.

Telangana Assembly Election 2023: आम्ही लोकांची नस पकडली; काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी

तेलंगणामध्ये काँग्रेस सध्या 60 जागांवर पुढे आहे. "आम्ही लोकांची नस पकडली, आणि त्यामुळेच यंदा मोठा बदल घडून येणार असा विश्वास आम्हाला होता. मी गेल्या वर्षभरापासून म्हणत आहे की विजय आमचाच असेल, आणि तेच होतं आहे" असं मत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी म्हटलं आहे

Telangana Assembly Election 2023

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये भाजप- काँग्रेसमध्ये चुरस

छत्तीसगडमध्ये काँग्रेस पिछाडीवर जाताना दिसत आहे. काँग्रेस सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणात काँग्रेस ६३ जागांवर आघाडीवर

तेलंगणात काँग्रेस ६३ जागांवर आघाडीवर आहे तर बीआरएस ४६ जागांवर पुढे आहेत. भाजप फक्त ५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये भाजपची पुन्हा आघाडी

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सध्या पिछाडीवर दिसत आहे. काँग्रेस सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे.

Telangana Assembly Election 2023: तेलंगणात बीआरएस पुन्हा शर्यतीत; ४९ जागांवर आघाडी

तेलंगणात बीआरएस पुन्हा शर्यतीत आली आहे. कॉंग्रेस सध्या ५९ जागांवर पुढे आहे. तर बीआरएस त्यापेक्षा फक्त १० जागांनी मागे आहे.

Telangana Assembly Election 2023: 'तेलंगणामध्ये भाजप महत्त्वाचा पक्ष ठरणार'; भाजप खासदार के लक्ष्मण यांचा विश्वास

'तेलंगणातील लोकांना बदल हवा आहे. बीआरएसच्या भ्रष्ट सरकारला इथली जनता कंटाळली होती. सध्या काँग्रेस बऱ्याच ठिकाणी आघाडीवर आहे, मात्र तेलंगणामध्ये भाजप देखील महत्त्वाचा पक्ष ठरणार आहे" असं मत भाजप खासदार के लक्ष्मण यांनी व्यक्त केलं.

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर

तेलंगणात मतमोजणीच्या पहिल्या कलानुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर बीआरएस ४६ जागांवर आघाडीवर असून भाजप आणि एमएआयएम ५ जागांवर पुढे आहे.

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर; काँग्रेस प्रमुख रेवंथ रेड्डी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे आपल्या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्या घरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. ही निवडणूक काँग्रेस जिंकेल अशी त्यांनी खात्री आहे.

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर; सर्व जागांचे कल समोर

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. सर्व 90 जागांचे कल उघड झाले आहेत. यापैकी भाजप 44 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 45 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Election Result 2023:  काँग्रेसला बहुमत मिळेल; टीएस सहदेव यांचा विश्वास

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री यांनी काँग्रेसच्या विजयाचा विश्वास दर्शवला आहे. प्लान बीची गरज नाही,काँग्रेसला बहुमत मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे.

Telangana Assembly Election : तेलंगणामध्ये मुख्यमंत्री केसीआर दोन्ही जागांवर मागे

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री केसीआर पिछाडीवर आहेत. काँग्रेस 65 जागांवर पुढे आहे, तर भाजप 5 जागांवर पुढे आहे. बीआरएस केवळ 40 जागांवर पुढे आहे.

तेलंगणात काँग्रेसची मुसंडी, सुरुवातीच्या कलात बहुमताचा आकडा गाठला

तेलंगणामध्ये मतमोजणीत काँग्रेसने सुरुवलातीच्या कलांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे.

काँग्रेस - 58

बीआरएस - 33

भाजप - 4

एमआयएम - 4

Telangana Assembly Election : तेलंगणाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हैदराबादमध्ये दाखल

तेलंगणामध्ये काँग्रेसने पहिल्या कलामध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत.

Telangana Assembly Election : तेलंगणामध्ये बीआरएसचं टेन्शन वाढलं; कॉंग्रेस आघाडीवर

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री केसीआर हे आघाडीवर आहेत. तर कामारेड्डीमधून पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे कामारेड्डी आणि कोदंगल या दोन्ही ठिकाणी आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Election Result : छत्तीसगडमध्ये कॉग्रेंस आघाडीवर

छत्तीसगडमध्ये क्रॉंगेस बहुमत मिळवताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सध्या 46 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh, Telangana Assembly Election : छत्तीसगडमध्ये सुरुवातीच्या आकड्यात काँग्रेसला बहुमत

छत्तीसगडमध्ये कॉंग्रसची आघाडी असल्याचे दिसत आहे.

Chhattisgarh, Telangana Assembly Election : छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला बहुमत; रुझानो मध्ये आघाडी

छत्तीसगडमध्ये कॉंग्रसची आघाडी दिसत आहे. रुझानो मध्ये क्रॉंगेसला बहुमत मिळताना दिसत आहे.

Telangana Election Result: तेलंगणात MIM च्या बालेकिल्लात काँग्रेसची आघाडी

हैदराबादमध्ये काँग्रेस आघाडीवर, MIM लाही धोबीपछाड देत असल्याचं चित्र, मुस्लीम मतदारांनी MIM ला दूर सारून काँग्रेसला जवळ केल्याचं चित्र

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर; टीएस सिंहदेव पुढे

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. ट्रेंडमध्ये अंबिकापूरमधून काँग्रेसचे टीएस सिंहदेव आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार येथे मागे पडले आहेत.

Telangana Election Result :तेलंगणामध्ये पिता-पुत्र;केसीआर-केटीआर आघाडीवर

कामारेड्डी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री केसीआर आघाडीवर तर सिरसिल्ला मतदारसंघात केटीआर हेदेखील आघाडीवर आहेत.

Chhattisgarh, Telangana Assembly Election 2023 Results LIVE: छत्तीगडमध्ये काँग्रेसची मोठी आघाडी, भाजप पिछाडीवर

छत्तीसगड विधासभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मतमोजणीचे प्राथामिक कल हाती आले आहेत. छत्तीगडमध्ये काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर असून भाजप फक्त २४ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे.

Telangana Election Results 2023: तेलंगणात सुरुवातीची कल हाती; काँग्रेस आघाडीवर, बीआरएस पिछाडीवर

तेलंगणा मतमोजणीत ४४ जागांचे पहिले कल आले हाती, काँग्रेस २७ जागांवर पुढे तर १७ ठिकाणी BRS आघाडीवर

Telangana Election Results 2023: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार तेलंगणात दाखल

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार तेलंगणात दाखल, मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवणार, काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघात एक आमदार पाठवण्यात येणार, नवनिर्वाचित आमदारांना हैदराबादला आणण्याची जबाबदारी कर्नाटकच्या आमदारांवर सोपवली. कर्नाटकच्या आमदारांवर मोठी जबाबदारी

Chhattisgarh Assembly Election 2023 Results :छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा

Telangana Election Results 2023: तेलंगणामध्ये मतमोजणीला सुरुवात

Telangana Election Results 2023: तेलंगणाच्या मतमोजणीला सुरुवात; बीआरएस दोन जागांवर आघाडीवर

तेलंगणाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला बीआरएस दोन जागांवर आघाडीवर

Chhattisgarh Raipur Uttar Constituency :  काँग्रेस उमेदवार विकास उपाध्याय यांच्याकडून हनुमान चालिसाचे पठण

छत्तीसगडमध्ये मतमोजणीआधी रायपूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विकास उपाध्याय यांच्याकडून हनुमान चालिसाचे पठण

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: रायपूर मतमोजणी केंंद्रावर चोख सुरक्षाव्यवस्था

छत्तीगड, तेलंगणात कुणाची सत्ता? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज म्हणजे ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ९० जागा आहेत. तर तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागा आहेत.  (Telangana Assembly Election Results 2023)

२०१८ मध्ये छत्तीगडमध्ये काँग्रेसचे, तर तेलंगणात बीआरस पक्षाने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी दोन्ही राज्यांमध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्णत: ताकदीने उरला होता. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी जंगी सभा घेतल्या होत्या. (Chhattisgarh Election Result 2023)

छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ४६ जागांची आवश्यकता असते. गेल्या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के. सी आर यांच्या बीआरएस आणि कॉंगेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होईल. भाजपा इथे कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com