Shivdeep Lande News 
देश विदेश

Bihar : महाराष्ट्राचा सिंघम राजकारणात, थेट नवा पक्ष काढला, मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

Shivdeep Lande News : ‘बिहारचा सिंघम’ म्हणून ओळख असलेले माजी आयपीएस शिवदीप लांडे यांनी 'हिंद सेना' नावाचा नवा पक्ष स्थापन करत राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. २४३ जागांवर निवडणुकीची तयारी.

Namdeo Kumbhar

Shivdeep Lande new party : सिंघम म्हणून ओळखले जाणारे मराठमोळे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत लांडे यांचा हा पक्ष निवडणूक लढवणार आहे. शिवदीप लांडे यांचा पक्ष बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवाराच्या विचारधारेला अनुसरणाऱ्यांनाच त्याला पक्षाची उमेदवारी दिली जाईल, असे लांडे यांनी सांगितले. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील असले तरी ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते आणि व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी बिहार सोडणार नसल्याचे जाहीर केले होते.

मराठमोळे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे आपल्या कणखर आणि प्रामाणिक कामगिरीमुळे 'बिहारचा सिंघम' म्हणून ओळखले जातात. आता पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत लांडे आपल्या नवा पक्षासह नशीब अजमावणार आहेत.

शिवदीप लांडे हे २००६ च्या तुकडीचे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी गेल्या वर्षी २२ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्णिया येथे महानिरीक्षक (आयजी) म्हणून कार्यरत असताना आपल्या सेवेतून राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. अखेर, मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी लांडे यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष 'राष्ट्रवाद, सामाजिक सेवा आणि समर्पण' या तत्त्वांवर काम करेल. "आमचा पक्ष जनतेचा आवाज बनेल आणि बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध असेल."

लांडे यांनी आपला पक्ष बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, स्वतः निवडणूक लढवणार की नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळले. "आमचे सर्व उमेदवार माझ्याच पाठिंब्याने लढतील. प्रत्येक उमेदवारामागे शिवदीप लांडे यांचे नाव असेल," असे ते म्हणाले. पक्ष सध्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभरात जनसंपर्क मोहीम राबवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT