Bloomberg Billionaires Index: इलॉन मस्क याने पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. मस्क बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnoult) यांना मागं टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. आता इलॉन मस्क 192 अब्ज डॉलर्स संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत आणि बर्नार्ड अर्नाल्ट 187 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
ट्विटर खरेदी केल्यानंतर गेल्या वर्षी इलॉन मस्कच्या () संपत्तीत मोठी घट झाली होती. बुधवारी सकाळपर्यंत बर्नार्ड अर्नाल्ट आणि इलॉन मस्क यांच्यात केवळ 2 अब्ज डॉलर्सचे अंतर होते. (Latest Marathi News)
बुधवारी संध्याकाळपर्यंत अर्नाल्ट यांच्या संपत्तीत 5.25 अब्ज डॉलर्सची घट झाली आणि दुसरीकडे इलॉन मस्कच्या संपत्तीत 1.28 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यामुळे दोघांमधील दरी तर मिटलीच पण मस्क पुढे गेला.
जगातील 500 सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या निर्देशांकात अव्वल स्थानासाठी मस्क आणि अर्नाल्ट यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. अर्नाल्ट यांनी डिसेंबर 2022 मध्ये सर्वात आधी मस्कला मागे टाकले होते.
पहिल्या दहा धनी व्यक्तींमध्ये मुकेश अंबानींना स्थान नाही
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना स्थान मिळू शकलेलं नाही. जगातील 500 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी (Mukesh Ambani Rank in Bloomberg Billionaires Index ) यांना 13 वं स्थान मिळालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.