Jitendra Awhad In Trouble : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Jitendra Awad's Objectionable Statement: आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
Case Registered Against Jitendra Awhad
Case Registered Against Jitendra Awhadsaam tv

Case Registered Against Jitendra Awhad: माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानतंर हिललाईन पोलीस ठाण्यात भादंवि १५३ अ, १५३ ब, २९५ अ आणि २९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी ठाण्याच्या कोपरी भागात सिंधी समाजाने आक्रमक होत मेळावा घेतला आणि आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असंसदीय शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याची भूमिका देखील समाजाने घेतली आहे.

Case Registered Against Jitendra Awhad
Pune PMC Recruitments: पुणे महापालिकेत ३२० जागांसाठी भरती! जून- जुलैमध्ये होणार परीक्षा; जाणून घ्या संपूर्ण माहिती..

उल्हासनगर प्रभात गार्डन कॅम्प-5 जवळ २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाविषीय आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर सिंधी समाज आक्रमक झाला आहे. बुधवारी कोपरीतील सिंधी समाजाने एकत्र येत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. (Latest Political News)

Case Registered Against Jitendra Awhad
Beed News: लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा शेतकऱ्यानेच केला भांडाफोड! थेट व्हिडिओ व्हायरल; बीडमध्ये खळबळ

जितेंद्र आव्हाड यांनी दिले स्पष्टीकरण

यावर स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी भाषणात बोललो होतो सौ जंगली कुत्ते किसी एक का शिकार नही कर सकते. ते एडिट करून आणि मॉर्फ करून व्हिडिओ चालविण्यात आला. मला माहित नाही व्हिडिओ कुठून आणला. केस ज्यांनी केली त्यांनी हा व्हिडिओ कुठून आणला? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com