Beed News: लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा शेतकऱ्यानेच केला भांडाफोड! थेट व्हिडिओ व्हायरल; बीडमध्ये खळबळ

Beed Latest News: याविषयी भूजल अधिकारी रोहन पवार यांनी आपली बाजू मांडताना हा चुकीचा आरोप असल्याचे म्हणले आहे.
Beed News
Beed NewsSaamtv
Published On

Beed News: रोजगार हमीच्या विहीर मंजुरीसाठी लागणाऱ्या भूजल विभागाच्या शिफारसपत्रासाठी खुद्द अधिकाऱ्यांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनीच स्टिंग ऑपरेशन करत व्हिडिओ व्हायरल केल्याने भूजल विभागासह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

Beed News
Bhandara Wedding News: संविधानाला साक्षी मानून लग्नगाठ अन् नवरीची मंडपात खास एन्ट्री; आदर्श विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, रोजगार हमी योजनेच्या विहिरीसाठी लागणाऱ्या भूजल विभागाच्या शिफारस पत्रासाठी, खुद्द भूजल अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याने घेतल्याचे स्टिंग ऑपरेशन शेतकऱ्याने केले आहे. नागो राठोड (रा. हारके) लिमगाव असं या शेतकऱ्याचे नाव आहे. नागो राठोड यांना रोजगार हमीची विहीर मंजूर करण्यासाठी भूजलचे शिफारस पत्र लागत होते. त्यामुळे शेतकरी नागो राठोड हे भूजल अधिकारी रोहन पवार यांच्याकडे गेले. यावेळी शिफारस पत्रासाठी 2 हजाराची लाच मागितली. मात्र लाच देत नसल्यामुळे त्यांना भूजल शिफारस पत्र मिळालेच नाही.

शेवटी गावातले दुसरे शेतकरी रमेश कवडे यांनी युक्ती लढवली आणि शिफारस पत्रासाठी ते नागो राठोड यांच्यासोबत गेले. यावेळी रमेश कवडे यांनी मोबाईलमध्ये थेट अधिकाऱ्यांना पैसे देतानाचा व्हिडिओ कैद केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे अधिकारी शेतकऱ्याला 1 हजार रुपये मागत असल्याचा संवाद आहे. या सर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Beed News)

Beed News
Amol Kolhe On Sharad Pawar: 'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण', अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभेचा चेंडू टाकला शरद पवारांच्या कोर्टात

याविषयी भूजल अधिकारी रोहन पवार यांनी आपली बाजू मांडताना हा चुकीचा आरोप असल्याचे म्हणले आहे. "आम्हाला बीडचे अहवाल पाठवतात त्यानुसार आम्ही शिफारस पत्र देतो हा सर्व आरोप जो आहे तो चुकीचा आहे असं म्हणत रोहन पवार यांनी संबंधित शेतकऱ्याला ओळखत नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, या शेतकऱ्याने लाच देताना स्टिंग केल्याने भूजल विभागासह प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवरून संबंधित विभाग आणि लाचलुचपत विभाग, यावर कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com