Amol Kolhe On Sharad Pawar: 'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण', अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभेचा चेंडू टाकला शरद पवारांच्या कोर्टात

Amol Kolhe On Shirur Loksabha Election 2024: या मतदारसंघासाठी दिलीप वळसे-पाटील आणि विलास लांडे इच्छुक असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Amol Kolhe On Sharad Pawar
Amol Kolhe On Sharad PawarSaam TV

दShirur News: शिरुर लोकसभा मतदार संघाचे (shirur loksabha election 2024 ) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या (MP Amol Kolhe) मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसची (NCP) नवी खेळी पहायला मिळत आहे. या मतदारसंघासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि भोसरीचे आमदार विलास लांडे इच्छुक असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच 'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण असं म्हणत शिरुर लोकसभा मतदारसंघाचा चेंडू खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) कोर्टात टाकला आहे.

Amol Kolhe On Sharad Pawar
Maharashtra Political News: राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परवानगीने शिंदे गटात, जयंत पाटील यांचा दावा; ६ महिन्यांसाठी...

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड, शिरुर, जुन्नरचे आमदार आणि आंबेगावचे आमदार माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्यासोबत शिरुर लोकसभा मतदार संघात फ्लेक्सबाजी करत शिरुर लोकसभा राष्ट्रवादी कॉग्रेसकडून लढण्याचे संकेत दिलेत. खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच स्थानिक आमदारांच्या जाहीर कार्यक्रमात अमोल कोल्हेंची गैरहजेरी हे मुळ कारण पहायला मिळाले.

Amol Kolhe On Sharad Pawar
10th Student Result News | दहावीचा निकाल उद्या 'या' अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार!

अशातच आता शिरुर लोकसभा मतदार संघातील पुणे-नाशिक, नगर-पुणे महामार्ग आणि प्रमुख शहरांमध्ये स्थानिक आमदारांच्या फोटोसह माजी आमदार विलास लांडेनी फ्लेक्सबाजी करत लोकसभेचे छायाचित्र फ्लेक्सवर लावून शिरुर लोकसभेतून लढण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे आता खासदार कोल्हेंचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता खुद्द अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण' असं म्हणत त्यांनी या मतदार संघाबाबतचा निर्णय शरद पवारच घेतली असे सांगितले आहे.

Amol Kolhe On Sharad Pawar
Political Breaking News: लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन! CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचे आव्हान

दरम्यान, महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाने 18 जागांवर दावा करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अशामध्ये राष्ट्रवादीतून आता लोकसभेसाठी आणखी एका नेत्याने दावा ठोकल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भोसरीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी आता खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या नावाचे बॅनर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com