Bhandara Wedding News: संविधानाला साक्षी मानून लग्नगाठ अन् नवरीची मंडपात खास एन्ट्री; आदर्श विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा

Unique Wedding Ceremony: विचाराने प्रगल्भ असलेल्या ‘या’ नव विवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला.
Bhandara Wedding News
Bhandara Wedding NewsSaamtv
Published On

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Bhandara Unique Wedding News: सध्या सर्वत्र लग्नांची धामधुम सुरू आहे. ज्यामधील अनेक किस्से हटके गोष्टी सोशल मीडियावर ऐकायला मिळत असतात. सध्या भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात एक हटके विवाह सोहळा पार पडला. या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. इतर लग्नांप्रमाणे ना डान्स, ना डीजे अगदी शांततेत लग्न होवूनही या लग्नाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

लग्नातील नवरीने विवाह समारंभात चक्क भारतीय संविधानाचा ग्रंथ हातात घेऊन वाजत गाजत खास एन्ट्री केल्याने उपस्थित पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतले. काय आहे या आदर्श विवाह सोहळ्याची जाणून घेवू...

Bhandara Wedding News
Amol Kolhe On Sharad Pawar: 'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण', अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभेचा चेंडू टाकला शरद पवारांच्या कोर्टात

आदर्श विवाह सोहळा...

याबाबत अधिक माहिती अशी की, लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरूणी प्रांजल धनराज बडोलेचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही नवरा नवरी पत्रकार आहेत. विचाराने प्रगल्भ असलेल्या ‘या’ नव विवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला. (Bhandara News)

संविधानाला साक्ष मानून बांधली लग्नगाठ...

हा विचार त्यांनी त्यांच्या लग्न सोहळ्यात अमलातही आणला. तथागत गौतम बुध्द आणि भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या प्रतिमेला वंदन करून विवाह सोहळ्याला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्ष मानून स्वातंत्र, समता, आणि बंधूता ही सांविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्द्म्मात जिवन जगण्याचा संकल्प देखील केला.

Bhandara Wedding News
Raosaheb Danve Offer To Congress Mla: 'हे डबल इंजिनचं सरकार, ज्याला बसायचं त्याने बसावं, मात्र ड्रायव्हर मी आहे', दानवेंची काँग्रेस आमदाराला ऑफर

या विवाह सोहळ्याचं पून्हा एक खास आकर्षण म्हणजे डॉ.बाबासाहेबांनी व्ही.एस.कर्डकांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा, यासंदर्भात ४ डिसेंबर १९५६ मध्ये पत्र लिहीले होते. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन केले होते.

लग्नात नवरीने मंडपात चक्क भारतीय संविधानाचा ग्रंथ हातात घेवून वाजत गाजत एन्टी केली. या हटके एन्ट्रीने उपस्थितांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले. सध्या या आदर्श विवाह सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com