सचिन जाधव, प्रतिनिधी...
PMC Job Recruitment: पुणे महापालिकेच्या आस्थापनावरील वर्ग एक ते वर्ग तीन संवर्गातील रिक्त ३२० पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत.या रिक्तपदांच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ जून आणि २ जुलै रोजी परीक्षा तीन सत्रात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत महापालिका प्रशासनाने (PMC) दिलेल्या माहितीनुसार, क्ष किरण तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणी संग्रहालय), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता (विद्युत विभाग), अग्निशमन विमोचन आणि फायरमन या पदासाठी २२ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.
तर आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पदासाठी २ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. या सर्व पदांसाठी १० हजार १७१ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले असून ३२० जागांची भरती करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, परीक्षा तीन सत्रात होणार असून उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना भ्रमणध्वनी लघुसंदेश आणि ई-मेलद्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळविता येणार आहे. परीक्षा केंद्र, दिनांक आणि कालावधी यांचा तपशील प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येणार आहे. (Pune News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.