Elon Musk  Saam TV
देश विदेश

Elon Musk: एलन मस्कचा मोठा धमाका; X वरून ऑडिओ-व्हिडिओ कॉल करता येणार

Priya More

Elon Musk Bug Announcement: अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांनी मागच्या वर्षी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. एलन मस्क यांनी सर्वात आधी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे (Social Media Platform) नाव बदलले. त्यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स केले.

आता एलन मस्क यांनी आणखी एक्ससंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. ज्याचा फायदा युजर्सला होणार आहे. मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मला एकटा एक्स टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तुम्हाला एक्सवरुन व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करणं शक्य होणार आहे.

एक्सचे नवीन मालक एलन मस्क हे त्यांचे अ‍ॅप सुपर अ‍ॅपमध्ये बदलण्याची योजना आखत आहे. या दिशेने त्यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करता येणार आहे. एलन मस्क यांनी स्वत: या बाबतची माहिती दिली आहे. हे फीचर कुठे काम करू शकेल हे त्यांनी सांगितले.

एलन मस्क यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असे सांगितले आहे की, आता लवकरच एक्सवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध होईल. हे फीचर वापरण्यासाठी कोणत्याही फोन नंबरची आवश्यकता नाही. एक्स हे एक प्रभावी ग्लोबल बुक आहे.'

त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, सर्व प्रकारचे फोन आणि लॅपटॉप नवीन फीचरचा लाभ घेऊ शकतील. हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि लॅपटॉपमध्ये सहज वापरता येणार आहे. व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसाठी कोणाचा फोन नंबर माहित असणे आवश्यक नाही. नंबर माहित नसतानाही तुम्ही एक्सच्या माध्यमातून एकमेकांशी बोलू शकणार आहात.'

एलन मस्क यांना एक्स प्लॅटफॉर्मला एव्हरिथिंग अ‍ॅप बनवायचे आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते पेमेंट सर्व्हिससह इतर वैशिष्ट्ये जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्ये एलन मस्क यांनी अद्याप व्हिडिओ-ऑडिओ कॉल्स एनक्रिप्ट केले जातील की नाही हे सांगितलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT