क्षणात अनर्थ! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन्...; महाडमध्ये थरारक अपघात|VIDEO

Car Crashes Into House In Mahad Raigad: रायगडच्या महाड तालुक्यातील वरंडोली येथे चालकाचा ताबा सुटल्याने झायलो जिप थेट घरात घुसली. सुदैवाने जीवितहानी टळली असून घर आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंडोली येथे आज भीषण अपघात झाला. झायलो जिपवरील चालकाचा ताबा सुटल्याने जिप थेट एका घरात घुसली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जिपसह घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. जिप घराच्या भिंतीला धडकून आत शिरल्याने घरातील साहित्याचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून चालकाची चौकशी सुरू आहे. पुढील तपास महाड पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com