Shruti Vilas Kadam
ओला किसलेला नारळ, कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर, तूप किंवा बटर आणि सजावटीसाठी डेसिकेटेड नारळ घ्या.
पॅनमध्ये तूप/बटर गरम करून त्यात किसलेला नारळ घाला. मंद आचेवर थोडा परतून कंडेन्स्ड मिल्क घाला.
मिश्रण सतत ढवळत रहा. ते पॅन सोडू लागेपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत शिजवा.
वेलची पूड किंवा व्हॅनिला एसेंस घालून मिश्रणाला सुगंधी चव द्या
मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताला तूप लावून लहान गोळे (ट्रफल्स) तयार करा.
तयार गोळे डेसिकेटेड नारळात घोळवा, त्यामुळे ट्रफल्सला आकर्षक लुक मिळतो.
ट्रफल्स फ्रिजमध्ये १५–२० मिनिटे ठेवा. थंड झाल्यावर स्वादिष्ट नारळाचे ट्रफल्स खाण्यास तयार!