Shreya Maskar
पापड चिवडा बनवण्यासाठी तळलेले उडीद पापड, पोहे, शेंगदाणे, काजू, मूग डाळ, चणा डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, हळद, लाल तिखट, साखर, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
पापड चिवडा बनवण्यासाठी पापड चांगले कमी तेलात तळून घ्या. त्यानंतर त्याचे तुकडे करा आणि एका डब्यात भरून ठेवा. त्याला हवा लागणार नाही याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे, काजू, मूग डाळ, चणा डाळ भाजून घ्या. चिवड्यासाठी जाड पोहे भाजून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, हळद, लाल तिखट चांगले परता. थोडी बडीशेप देखील तुम्ही टाकू शकता.
मोठ्या बाऊलमध्ये तळलेले पोहे, डाळी, शेंगदाणे, काजू, पापडाचे तुकडे, मूग डाळ, चणा डाळ आणि सर्व मसाले मिक्स करा.
शेवटी चिवड्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालून चांगले मिसळा. तुम्ही यात आलू शेव देखील टाकू शकता. जेणे करून चिवडा अधिक चटपटीत बनेल.
चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा. म्हणजे तो जास्त वेळ कुरकुरीत राहील. तसेच शाळेतून आल्यावर लहान मुलांना देण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
तुम्ही यात खाण्याच्या वेळी कांदा, टोमॅटो , हिरवी मिरची, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, फरसाण देखील टाकू शकता. पापड चिवड्याची चटपटीत भेळ होईल.