Shreya Maskar
ख्रिसमसला घरी पार्टीमध्ये चटपटीत पदार्थ ठेवा. यात तुम्ही रात्री जेवणाला पनीर बिर्याणीचा आस्वाद घ्या.
पनीर बिर्याणी बनवण्यासाठी कांदे उभे पातळ चिरून घ्या. पॅनमध्ये तेल टाकून कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्या. गॅस कमी ठेवा.
पनीर बिर्याणीसाठी बासमती तांदूळ चांगला वाटतो. त्यामुळे एका बाऊलमध्ये तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून ठेवा. जेणेकरून तो चांगला फुलेल.
पनीर मॅरीनेट करण्यासाठी बाऊलमध्ये पनीर, दही, आलं-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, हिरवी मिरची आणि पुदीन्याची पाने घालून चांगले एकजीव करा. पनीरला सर्व मिश्रण लागायला हवे.
दुसरीकडे उकळत्या पाण्यात तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, बासमती तांदूळ, काळी वेलची, वेलदोडे, लवंगा, जायफळ, चक्रफूल, इतर खडे मसाले टाकून शिजवून घ्या.
मोठ्या पातेल्यात शिजलेला भाताचा एक लेअर पसरवा. त्यावर पनीरचा लेअर मग कांद्याची आणि पुदीन्याची पाने असा लेअर बनवा. ही प्रोसेस २ वेळा करा.
त्यानंतर उरलेली सर्व ग्रेव्ही, साजूक तूप, भाताचे पाणी घालून भात शिजायला ठेवून द्या. गॅसची आच कमी ठेवा. १५-२० मिनिटांत पनीर बिर्याणी चांगली शिजेल.
शेवटी मळलेली कणिक भांड्याच्या झाकणाला गोल लावून पनीर बिर्याणी मध्यम आचेवर शिजवा. तुम्ही रायता आणि पापडसोबत बिर्याणीचा आस्वाद घ्या.