सुरतमध्ये एक व्यक्ती १०व्या मजल्यावरून पडून ८व्या मजल्यावरील लोखंडी ग्रिलमध्ये अडकली
खिडकीला ग्रिल नसल्याने सकाळी झोपेत असताना तोल गेला
१ तास उलटे हवेत लटकत राहिल्यानंतर फायर-ब्रिगेडने जीव वाचवला
बचावानंतर कुटुंबीयांना मोठा दिलासा; व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
उंच इमारतीतून पडण्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत, ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे. सदर व्हिडिओ हा सुरत मधील असल्याचं म्हटलं जात आहे. एक व्यक्ती इमारतीच्या एका खिडकीत उलटे लटकलेले पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या रांदेर भागातील जहांगीराबाद येथील टाइम गॅलेक्सी इमारतीत नितीनभाई अडिया हे राहतात. त्यांचे वय ५७ वर्ष आहे. ते या इमारतीच्या १० मजल्यावर राहातात. ते आपल्या घराच्या खिडकी जवळ सकाळी आठच्या सुमारास झोपले होते. त्याच वेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खिडकीतून खाली पडले. मात्र त्यानंतर जे घडलं ते थरकाप उडवणार चित्र होत.
नितीनभाई १० व्या मजल्यावरून खाली पडले खरे, पण ते जमिनीवर न पडता ८ व्या मजल्यावरील खिडकीच्या लोखंडी ग्रिलमध्ये अडकले. त्यांचा एक पाय ग्रिलमध्ये अडकल्याने ते हवेत उलटे लटकत राहिले. सुमारे एक तास मृत्यूने त्यांना कवटाळले होते. हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. तिथे असणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ झाली. त्यांनी तातडीने त्यांना वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. तोपर्यंत नितीनभाई ग्रिलला उलटे लटकूनच होते.
नितीनभाई यांच्या घराच्या खिडकीला ग्रिल नव्हती. त्यामुळे त्यांचा तोल गेल्यानंतर ते थेट खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी १० व्या मजल्यावरून दोरी आणि सेफ्टी बेल्टच्या मदतीने नितीनभाईंना सुरक्षित पकडले. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक त्यांना ग्रिलमधून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाने तब्बल एक तास मेहनत घेत त्यांची मरणाच्या दारातून सुटका केली. अनेक जण त्यावेळी चिंतेत पडले होते. नितीनभाईंचे कुटुंबीय ही चिंतेत होते. नितीनभाईंची सुटका झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांच्या जिवात जीव आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.