पॅन आणि आधार कार्ड लिंकिंगनंतर आता मतदानकार्डही आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याबाबत निर्णय घेतला असून, लवकरच यासंदर्भात तांत्रिक तज्ज्ञांसोबत लवकरच सल्लामसलत सुरू होणार आहे.
संविधानाच्या कलम ३२६ आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) नुसार, EPIC आधारशी जोडले जाईल. यापूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. आता मतदान कार्डही आधारशी लिंक करता येणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या सदनात बैठक पार पडली. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव, कायदे विभाग, सचिव एमईआयटीवाय आणि सीईओ यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित होते.
फक्त भारतीय नागरिकांनाच मतदानाचा अधिकार
भारतीय संविधानाच्या कलम ३२६ नुसार, मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकालाच मिळू शकणार आहे. आधार कार्डच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची ओळख होते. त्यामुळे मतदानकार्ड आधारशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हे बदल संविधानाच्या कलम ३२६, लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) आणि WP (सिव्हील) क्रमांक १७७/२९०२३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केले जाणार आहे. आता UIDAI आणि ECI च्या तांत्रिक तज्ञांमध्ये सल्लामसलत केली जाईल.
अंमलबजावणी कधी?
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत. केंद्र सरकारकडून आवश्यक तांत्रिक सुधारणाही करण्यात येतील. मतदानकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी निश्चित कालावधीही दिला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.