Crime News: शिक्षकच बनला भक्षक ! ३० हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण, VIDEO पॉर्न साईटवर करायचा पोस्ट

Professor Caught with 65 Obscene Videos: एका कॉलेजच्या प्राध्यापकाने ३० हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Crime
CrimeSaam
Published On

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका कॉलेजच्या प्राध्यापकाने ३० हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनमधून ६५ अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. त्यापैकी अधिक अश्लील व्हिडिओ महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे असल्याचं समोर आलं आहे. त्याने हे व्हिडिओ पॉर्न साईट्सवरही अपलोड केलं आहे.

रजनीश कुमार असे भूगोल प्राध्यापकाचे नाव आहे. तो मुलींना परीक्षेत चांगले गुण आणि नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्या जाळ्यात ओढायचा. नकार देणाऱ्या मुलींना धमकवायचा.

Crime
Nagpur News: २०-३० लोक स्कार्फ बांधून आले, धारदार शस्त्र अन् बाटल्यानं परिसर जाळलं; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

गेल्या अनेक वर्षांपासून नराधमाकडून हे कृत्य सुरू होते. एका तरुणीने या विरुद्ध तक्रार दाखल केली. पण कोणतीही कारवाई झालेली नाही. नंतर तिने ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून नराधम प्राध्यापक करत असलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली.

Crime
Aurangzebs Tomb: औरंगजेबचा मृत्यू कसा झाला? शेवटच्या दिवसात नेमकं काय घडलं?

महिला आयोगाच्या आदेशानुसार पोलिसांनी प्राध्यापक रजनीश याची चौकशी केली. चौकशीमध्ये आरोपीचा मोबाईल देखील तपासला. पोलिसांनी मोबाईल डेटा जप्त केला तेव्हा ६५ अश्लील व्हिडिओ सापडले. यानंतर १३ मार्च रोजी हाथरस गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी प्राध्यापक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com