Election Commission  Saam tv
देश विदेश

धुळवडीनंतर धुरळा उडणार; ७ राज्यात निवडणुकीची घोषणा होणार, वाचा सविस्तर

Election Commission : देशातील विविध भागात धुळवडीच्या दिवसानंतर धुरळा उडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

होळीनंतर ७ राज्यांत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे

पश्चिम बंगालमध्ये ५ ते ७ टप्प्यांत मतदानाची शक्यता

SIR प्रक्रियेमुळे वातावरण तापले

होळी झाल्यानंतर निवडणूक आयोगानंतर मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निवणडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये SIR ची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरून वाद सुरू आहे. यामुळे आयोगाकडून तामिळनाडू, आसाम, पोंडेचेरीमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये एकाचवेळी निवडणुका होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ५ ते ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. यंदा होणाऱ्या निवडणुकीतही हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, असा शक्यता व्यक्त केली जात आहे. 2021 साली ८ टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या.

पश्चिम बंगालमध्ये कोरोना काळात ८ टप्प्यात निवडणुका झाल्या. यंदा काही टप्पे कमी करण्याची आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कमीत कमी ५ टप्प्यात निवडणुका होऊ शकतात. याआधी २०१६ आधी झालेल्या निवडणुकीत ६ टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. यंदा कोरोना देखील नाही. परंतु SIR वरून पश्चिम बंगालमध्ये ६ टप्प्यात मतदान होऊ शकते.

SIR वरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. पश्चिम बंगालमधील ६० लाख मतदारांची नावे यादीतून काढून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये २०२१ साली २ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर ७ मे रोजी सरकार स्थापन करण्यात आलं.

केरळ विधानसभेच्या यंदाच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस २३ मे रोजी आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्येही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सध्या तामिळनाडू, आसाम, पाँडेचेरी या राज्याच्या निवडणुका आधी जाहीर होण्याची शक्यता आहे. २०२६ या वर्षात देशातील एकूण ५ राज्यातील निवडणुका होऊ शकतात. त्याआधी देशातील १० राज्यातील ३७ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये १० मे रोजीपर्यंत नव्या सरकारची स्थापना व्हायला पाहिजे. तर २० मे ही आसामची अंतिम तारीख आहे. तर पाँडेचेरी रोजी १५ जून रोजी अंतिम तारीख आहे. पश्चिम बंगालमध्ये SIR मुळे निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या गोटमार यात्रेत अनेक जण गंभीर जखमी

Rajya Sabha Elections: भाजपकडून 9 उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाले तिकीट? वाचा यादी

Holi 2026 : होळीचा रंग गेला, पण त्वचा अजून निस्तेज दिसतेय? मग 'हा' घरगुती उपाय करा, चेहरा नव्याने चमकेल

SCROLL FOR NEXT