Elderly Father saam tv
देश विदेश

Elderly Father: वडिलांचं वृद्धाश्रमात निधन, अस्थी घेण्यासाठी आल्या नाहीत लेकी; ५१०० रुपये पाठवले अन् म्हणाल्या...

Elderly father dies waiting for daughters to visit: हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला एकही मुलगी उपस्थित राहिली नाही. अखेर वृद्धाश्रमानेच अंत्यसंस्कार केले. या हृदयद्रावक घटनेने पालकांची उपेक्षा आणि नातेसंबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

एका वडिलांनी आयुष्यभर आपल्या तीन मुलींसाठी कष्ट केलं. त्यांना चांगलं शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याच वडिलांना आपल्या मुलींची वाट पाहतच डोळे मिटावे लागले. इतकंच नाही त्यांच्या अंत्यदर्शनालाही एकही मुलगी आली नाही. अंत्यसंस्कारानंतर अस्थी घेण्यासाठीही कोणी पोहोचलं नाही. आयुष्यभर कुटुंबासाठी जगलेल्या एका वडिलांचा शेवट इतका एकाकी झाला की ही घटना ऐकून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

नात्यांची दुसरी बाजू दाखवणारी ही मन हेलावून टाकणारी घटना हरियाणातील सोनीपतमधून समोर आलीये. वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका ज्येष्ठ कपडा व्यापाऱ्याचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहिला नाही. आपल्या मुलींना शेवटचं एकदा भेटावं अशी इच्छा मनात असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील शिवचरण रतन गुप्ता हे एकेकाळचे मोठे कपडा व्यापारी होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी ते पत्नी मीना गुप्ता यांच्यासोबत सोनीपतमधील एका वृद्धाश्रमात राहण्यासाठी आले होते.

शिवचरण गुप्ता यांना मुलगा नव्हता. त्यांनी आपल्या तीनही मुलींना शिकवलं, मोठं केलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यापैकी दोन मुलींना त्यांनी शिक्षिका बनवलं. काही काळापूर्वी त्यांच्या पत्नी मीना गुप्ता यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ते वृद्धाश्रमातच राहत होते.

वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनी सांगितलं की, शिवचरण गुप्ता आजारी पडल्यानंतर तब्बल २० दिवस आधी त्यांच्या तिन्ही मुलींना अनिता, निशा आणि प्रिया यांना याची माहिती देण्यात आली होती. मात्र, तिघींनीही वेगवेगळी कारणं सांगितली आणि वडिलांना भेटण्यासाठी त्या आल्या नाहीत.

आनंद यांनी सांगितलं की, शिवचरण गुप्ता यांच्याकडे मुलींशी बोलण्यासाठी एक मोबाईल फोन होता. मात्र आजारी पडल्यानंतर मुलींचे फोनही येणं बंद झालं होतं. आम्ही त्यांना वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचं कळवलं तरीही त्या आल्या नाहीत. त्यांच्या निधनानंतरही आम्ही मुलींना सांगितलं की, तुम्ही येणार असाल तर मृतदेह सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करतो. पण त्यांनी वेळ नसल्याचं सांगत येण्यास नकार दिला.

शिवचरण गुप्ता यांची मोठी मुलगी अनिता ही नेपाळमध्ये राहते आणि तिथे शिक्षिका म्हणून काम करते. दुसरी मुलगी निशा उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये राहते, तर धाकटी मुलगी प्रिया मुंबईत राहते. मात्र तिघींपैकी एकही वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिली नाही.

अखेरीस वृद्धाश्रमाच्या मदतीने शिवचरण गुप्ता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिन्ही मुलींनी व्हिडीओ कॉलवरून वडिलांचा अंत्यसंस्कार पाहिला. मोठी मुलगी अनिताने ऑनलाइन ५,१०० रुपये पाठवत वडिलांवर विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली.

सुरुवातीला मुलींनी वडिलांच्या अस्थी जपून ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र नंतर वेळ नसल्याचं कारण देत त्यांनी वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनाच त्या गंगेत विसर्जित करण्यास सांगितलं. इतकंच नाही, अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचे सर्व व्हिडीओही त्यांना पाठवण्याची विनंती मुलींनी व्हिडीओ कॉलवरून केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार- नवापूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे खोरघर धरण ओवरफ्लो

Asthma Attack : अस्थमा रुग्णांसाठी फक्त धूळच नाही, तर पावसाचे थेंबही ठरू शकतात घातक

Agriculture Scam: १५ कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, कृषिमंत्र्यांची मोठी कारवाई

Breaking News : खंडणीप्रकरणी भाजपच्या २२ नेत्यांचे निलंबन, राजकारणात खळबळ

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठा बदल, आज वाढ झाली की घसरण; तुमच्या शहरातील १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

SCROLL FOR NEXT