देश विदेश

ED Raid: दारू घोटाळ्याप्रकरणी कारवाई ED ची कारवाई; माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापेमारी

ED Raid On Former CM House In Chhattisgarh: छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज सकाळपासून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल घरावर आणि इतर अनेक ठिकाणी ईडीने छापे मारले आहेत.

Bharat Jadhav

छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल आणि त्यांच्या मुलाच्या घरावर आणि इतर अनेक ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहे. या प्रकरणी ईडीने राज्य सरकारी नोकरदार आणि व्यावसायिकांसह अनेकांना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भुपेश बघेल आणि त्यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या घरी तसेच इतर ठिकाणांवर छापेमारी केली.

मिळालेल्या माहितीनुसार ईडीने पीएमएलए कायदा अंतर्गत दुर्ग जिल्ह्यातील 14 ठिकाणी छापे टाकण्यात आलीत. ज्या ठिकाणी छापेमारी झालीय, ते छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी संबंधित आहेत. बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. चैतन्य बघेलचा देखील दारू घोटाळ्यात सहभाग असल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये गुन्ह्यांचे एकूण उत्पन्न अंदाजे 2,161 कोटी रुपये आहे, जे विविध योजनांद्वारे मिळवले गेले आहे.

भूपेश बघेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रकरणी पोस्ट केली आहे, "सात वर्षांपासून सुरू असलेला खोटा खटला न्यायालयात फेटाळलाय. आज सकाळी माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस भूपेश बघेल यांच्या भिलाई येथील निवासस्थानी ईडीचे पाहुणे दाखल झाले आहेत.या षडयंत्राद्वारे पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर तो गैरसमज आहे.

याप्रकरणी ईडीने याआधीही कारवाई केलीय. मे २०२४ मध्ये तपास यंत्रणेने माजी आयएस अनिल टुटेजा आणि रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचे भाऊ अन्वर ढेबर यांच्यासह अनेक आरोपींच्या सुमारे १८ जंगम आणि १६१ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या, ज्यांची किंमत २०५.४९ कोटी रुपये होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT