Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तीची पाकिस्तानात हत्या

Kulbhushan Jadhav Case: ISI ने 2016 मध्ये कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते. या कामात मुफ्ती शाह मीर यांनी पाक गुप्तचर संस्थेला मदत केली होती.
Kulbhushan Jadhav Case
Kulbhushan Jadhav CaseSaam tv
Published On

कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला (आयएसआय) मदत करणाऱ्या मुफ्ती शाह मीरची हत्या झालीय. हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. दरम्यान गोळीबारानंतर शाह मीरला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले.

शाह मीर हे बलुचिस्तानचे प्रमुख मुफ्ती होते. याआधी त्याच्यावर दोनवेळा जीवघेणे हल्ले झाले. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्रीच्या नमाजानंतर तुर्बतमधील स्थानिक मशिदीतून बाहेर पडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मुफ्तीचा मृत्यू झाला.

Kulbhushan Jadhav Case
Hindu Temple Attack : अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, भारत आणि मोदींच्या विरोधात मजकूर लिहिला

शाह मीर हा कट्टरवादी पक्ष जमियत उलेमा-ए-इस्लाम (JUI) चा सदस्य होता. मुफ्ती असल्याच्या नावाखाली तो शस्त्रास्त्र आणि मानवी तस्कर म्हणून काम करत होता. इतकेच नाही तर तो आयएसआयलाही मदत करत होता. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना त्याने भेट दिल्याच्या बातम्याही वारंवार येत आहेत. गेल्या आठवड्यात बलुचिस्तानमधील खुजदार शहरात मीरच्या पक्षाच्या अन्य दोन सदस्यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्यांमागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Kulbhushan Jadhav Case
Russia Attack: युक्रेनमध्ये मृत्यूतांडव; रशियाकडून पुन्हा मिसाईल हल्ला 25 जणांचा मृत्यू

कुलभूषण जाधव प्रकरण

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतर इराणमधील चाबहार येथे व्यवसाय करत होते. २०१६ मध्ये त्याचे इराण-पाकिस्तान सीमेजवळून अपहरण करण्यात आले होते. आयएसआयने हे मिशन पार पाडले होते. यासाठी मुफ्ती शाह मीरने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला मदत केली होती. यानंतर जाधव यांना पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात देण्यात आले.

कुलभूषण जाधव अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. २०१७ मध्ये पाकिस्तानी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताच्या अपीलनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१९ मध्ये त्याच्या फाशीला स्थगिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com