Hindu Temple Attack : अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, भारत आणि मोदींच्या विरोधात मजकूर लिहिला

US Hindu Temple Attack News: अमेरिकामध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भिंतीवर भारताविरोधात मजकूर आढळला आहे. स्थानिक भारतीयांमध्ये भितीचे वातावरण आहे.
US Hindu Temple Attack
US Hindu Temple Attack baps & @HinduAmerican
Published On

US Hindu Temple Attack : अमेरिकेत हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. तेथील भिंतीवर भारताच्या आणि मोदी यांच्या विरोधात संदेश लिहिण्यात आला आहे. कॅलिफोर्निया येथील BAPS मंदिरात शनिवारी तोडफोड झाली. अमेरिकेतील भारतीयांमध्ये भितीचे वातावरण आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील बीएपीएस हिंदू मंदिरात शनिवारी काही अज्ञात तरूणांनी तोडफोड केली. त्याशिवाय आपत्तीजनक मजकूर लिहिण्यात आला. मंदिराच्या परिसरात भारताच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या भारतीयांमध्ये भितीचे वातवरण आहे.

कॅलिफोर्निया येथील चिनो हिल्स परिसरात असलेले बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात शनिवारी काही जणांनी तोडफोड केली. मंदिराच्या बाहेर जोरदार घोषणाबाजीही कऱण्यात आली. हिंदू-अमेरिका फाऊंडेशनच्या वतीने याप्रकरणाची एफबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मंदिरात तोडफोड केल्यानंतर भारताच्या विरोधातील मजकूरही भिंतीवर लिहिण्यात आला.

BAPS ने काय म्हटले ?

BAPS च्या एका अधिकाऱ्याने एक्सवर या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याशिवाय शांततेच आवाहनही कऱण्यात आलेय. दुसर्‍या मंदिराच्या अशुद्धतेच्या समोर हिंदू समुदाय द्वेषाविरूद्ध ठामपणे उभा असेल. कॅलिफोर्नियाच्या नागरिकांसोबत आम्ही कधीही द्वेष करू देणार नाही. शांती, विश्वास आणि एकत्र राहखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बीएपीएसद्वारे सांगण्यात आले.

पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे जगभरात 1,300 पेक्षा जास्त हिंदू मंदिरे आहेत. लंडन, शिकागो, टोरंटो, नैरोबीसह जगभरातील प्रमुख शहरात मंदिरे आहेत. कॅलिफोर्नियातील चिनो हिल्सजवळील मंदिराचे उद्घाटन २०१२ मध्ये झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com