ईडीने कर्नाटक आमदार केसी वीरेंद्र यांच्या विरोधात मोठी कारवाई केली
४० किलो सोनं आणि १०३ कोटींची मालमत्ता जप्त
ईडीने आतापर्यंत आमदाराची एकूण १५० कोटींची संपत्ती जप्त केली
केसी वीरेंद्र न्यायालयीन कोठडीत असताना ही कारवाई करण्यात आली
ऑनलाइन बेटिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने आमदार केसी वीरेंद्र यांची तब्बल १५० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये ४० किलो सोनं आणि १०३ कोटींच्या मालमत्तेचा समावेश आहे. ही कारवाई मुख्य आरोपी म्हणजेच कर्नाटकातील चित्तदुर्ग जिल्ह्यातील आमदार केसी वीरेंद्र न्यायालयीन कोठडीमध्ये असताना करण्यात आली. यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी केसी वीरेंद्र आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या ऑनलाइन बेटिंग घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात बेंगळुरूमधील ईडी पथकाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत अनेक ठिकाणी छापे टाकले. छापे टाकताना चल्लाकेरे येथील दोन लॉकरमधून अंदाजे ४० किलो २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले. या मालमत्तेची अंदाजे किंमत ५०.३३ कोटी रुपये इतकी आहे. यापूर्वी ईडीने २१ किलो सोन्याच्या वीटा, रोख रक्कम, सोने आणि चांदीचे दागिने, बँक खाती आणि आलिशान वाहनांसह तब्बल १०३ कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली होती.
ही कारवाई मुख्य आरोपी चित्तदुर्ग जिल्ह्यातील आमदार केसी वीरेंद्र हे न्यायालयीन कोठडीत असताना करण्यात आली. या प्रकरणातील एकूण जप्तीची रक्कम आतापर्यंत १५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. ईडीच्या तपासात असे दिसून आले की, केसी वीरेंद्र हे त्यांचे मित्र आणि कुटुंबासह किंग ५६७ आणि राजा ५६७ सारख्या अनेक बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग वेबसाइट चालवत होते. ज्यांचा वापर सामान्य लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी केला जात होता.
खेळाडूंकडून गोळा केलेले पैसे फोन पैसा आणि अनेक 'मूल अकाउंट्स' सारख्या पेमेंट गेटवेद्वारे विविध ठिकाणी पाठवले जात होते. हे बँक अकाऊंट भारतातील मध्यस्थांनी बनावट नावांनी उघडली होती. ज्यांच्या नावाने अकाऊंट उघडली गेली त्यांना नाममात्र रक्कम देण्यात आली होती. ईडीच्या तपासात असे दिसून आले की, या ऑनलाइन बेटिंग अॅप्सची उलाढाल २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते देशभरात घडणाऱ्या काही सायबर गुन्ह्यांशी थेट जोडलेले आहेत.
तपासातून हे देखील उघडझाले की, या बनावट अकाऊंटद्वारे केसी वीरेंद्र, त्याचे कुटुंबीय आणि सहकारी यांनी परदेशात प्रवास केला, व्हिसा आणि महागड्या गाड्यांवर खर्च केला. पैशांचा खरा स्रोत लपवण्यासाठी मार्केटिंग, बल्क एसएमएस, वेबसाइट होस्टिंग आणि एसइओ सेवांसाठीचा खर्च देखील या अकाऊंटद्वारे भावला जात होता. ईडीकडून या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा तपास सुरू आहे. यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची देखील चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.