India Earthquake Saam TV
देश विदेश

Turkey Earthquake News: तुर्कीप्रमाणे भारतातही भूकंप होणार? IIT प्राध्यापकाचा खळबळजनक दावा, केंद्रबिंदूही सांगितला

साम टिव्ही ब्युरो

India Earthquake :  तुर्कस्तान आणि सीरिया या दोन देशांना सोमवारी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी भुकंपाचे तीव्र झटके बसले. आतापर्यंत या भूकंपात १६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. लाखो नागरिक बेघर झाल्याने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  (Latest Marathi News)

अशातच, कानपूरच्या IIT प्राध्यापकाने एक खळबळजनक दावा केला आहे.  तुर्कस्तान आणि सीरियाप्रमाणे भारतातही लवकरच भूकंप होईल. त्यामुळे आपण सजग आणि सतर्क राहिले पाहिजे. असं या प्राध्यापकाने म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून असं कुठलंही संकट भारतावर येऊ नये, अशी प्रार्थना अनेकजण करीत आहेत.

प्राध्यापकाचा नेमका दावा काय?

गेल्या वर्षी भारताच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. याबाबत आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक जावेद मलिक सांगतात की, येत्या काही दिवसांत देशात जोरदार भूकंप होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय, अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे. येणाऱ्या काळात आपण सजग आणि सतर्क राहिले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भूकंप होण्याचे कारण काय?

एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राध्यापक जावेद मलिक यांनी सांगितले की, जमिनीच्या आत असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स जेव्हा एकमेकांशी टकरतात, तेव्हा त्यांच्यातील शक्तीने एक भयंकर ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे भूकंप (Earthquake) होतो. जर उर्जा जास्त असेल तर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात हे धक्के खूपच भयानक आणि धोकादायक असतात.

भारतातील भूकंपीय क्षेत्र कोणती?

प्रोफेसर जावेद मलिक सांगतात की, देशात भूकंपासाठी पाच झोन तयार करण्यात आले आहेत. झोन 5 चे क्षेत्र सर्वात धोकादायक आहेत. तर झोन 2 सर्वात सुरक्षित मानला जातो. कानपूरबद्दल बोलायचे झाले तर कानपूर झोन 3 मध्ये येतो. ज्यावर भूकंपाचा थोडासा प्रभाव दिसतो. झोननुसार क्षेत्रांबद्दल बोलायचे झाल्यास, कच्छ, अंदमान आणि निकोबार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर जवळपासची राज्ये आणि शहरे झोन 5 मध्ये आहेत.

झोन 4 मध्ये बहराइच, लखीमपूर, पिलीभीत, गाझियाबाद, रुरकी, नैनिताल, लखीमपूर आणि इतर तराई क्षेत्रांचा समावेश आहे. झोन 3, कानपूर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, सोनभद्र, चंदौली आणि इतर जवळच्या शहरांबद्दल बोलत आहोत. झोन २ बद्दल बोलत असताना भोपाळ, जयपूर, हैदराबाद आणि इतर जवळची शहरे येतात.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT