earthquake  facebook
देश विदेश

भल्या पहाटे पुन्हा भूकंपाचे हादरे; जमीन थरथरली, लोक घर सोडून पळाले

earthquake News : भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. मराठाड्यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या डोडा भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

Vishal Gangurde

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भूकंपाने नागरिक भयभीत

म्यानमारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका ठिकाणी भूकंप झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या डोडा भागात रविवारी पहाटे 4:32 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. डोडा भागातील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.६ इतकी नोंदवली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने लोक घर सोडून पळाले.

डोडा भागात झालेल्या भूकंपाने काही क्षणासाठी लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही मिनिटांसाठी लोकांची धावाधाव पाहायला मिळाली. यात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. जम्मू-काश्मीरसहित म्यानमारमध्येही आज भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र जमिनीापासून १४० किलोमीटर खाली असल्याची माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीने दिली. जमिनीपासून कमी खोलीवर होणार्‍या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान होते.

जम्मू-काश्मीरमधील डोडा भाग भूकंपाच्या दृष्टीने आधीच संवेदनशील मानला जातो. आधी हे क्षेत्र सिस्मिक झोन IV आणि V मध्ये येते होते. परंतु आता ते क्षेत्र सिस्मिक झोन IV मध्ये ठेवण्यात आलं आहे. यामुळे सरकारने इमारतीच्या दृष्टीने कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. आता धोकादायक इमारती मजबूत करण्याचे काम सुरू आहेत.

मार्च महिन्यात या क्षेत्रातील भागाची माहिती आणि अभ्यास करण्यासाठी विशेष पथकाची समिती स्थापना केली होती. तसेच एका विशेष एजन्सीला देखील जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या लोकांना भूकंपाशी संबंधित माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीच्या प्लॅटफॉर्मवर मिळते.

तत्पूर्वी, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात काल रिश्टर स्केलवर ४.७ भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली. या भूकंपाचे धक्के नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात जाणवले. या भूकंपात कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: उकाड्यामुळे घराबाहेर झोपले अन् भयंकर घडलं, भरधाव डंपरने चौघांना चिरडले; संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत

Water Metro : मुंबईकरांसाठी खुशखबर! पहिली वॉटर मेट्रो २५ मे रोजी बंदरात दाखल होणार; वाचा A to Z माहिती

Maharashtra News Live Update: डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नागपूर पुणे मुंबई महामार्ग रोखला.

Raghav Chadha : भाजप प्रवेशानंतर राघव चड्ढा यांना मोदी सरकारनं दिली मोठी जबाबदारी

भाजपच्या बूथ अध्यक्षांचे निधन; पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT