Intoxicated Man Tries to Urinate on Wife Saam Tv Marathi
देश विदेश

नशा करून आला अन् बायकोवर लघवी करण्याचा प्रयत्न; विरोध करताच धारदार शस्त्रानं जागीच संपवलं

Intoxicated Man Tries to Urinate on Wife: नवऱ्यानं दारू पिऊन बायकोवर लघवी करण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करताच नवऱ्यानं बायकोला संपवलं.

Bhagyashree Kamble

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातून एका खळबळजनक हत्याकांड समोर आला आहे. एका नशेखोर पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत नवऱ्यानं बायकोच्या डोक्यावर लघवी करण्याचा प्रयत्न केला. तिनं या गोष्टीचा प्रतिकार केला. यानंतर नवऱ्याला राग अनावर झाला. संतापून नवऱ्यानं धारदार शस्त्राने पत्नीवर वार केले. या हल्ल्यात बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास करून आरोपी पतीला ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही धक्कादायक घटना बगीचा पोलीस स्टेशन परिसरातील पंड्रापाठ चौकीतील पाकरीटोली गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लरंगसाय कोरवा असे आरोपीचं नाव आहे. आरोपी दररोज दारू पिऊन घरी यायचा. सोमवारी सायंकाळी तो दारू पिऊन घरी परतला. यादरम्यान, त्यानं त्याची पत्नी संतोषी बाई (वय वर्ष ४०) हिच्यावर लघवी करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर तिने प्रतिकार केला. तेव्हा आरोपीला राग अनावर झाला. त्यानं घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. शेजाऱ्यांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

शेजाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. पंड्रापाठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. तसेच पंचनामा करून तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : बीडमध्ये निवडणुकीला हिंसक वळण, दोन गटात राडा अन् दगडफेक

Signs Of Heart Failure: मानेची ही एक टेस्ट सांगेल हार्ट अटॅक येणारे; अवघ्या २० मिनिटात कळेल धोका किती?

Satellite Based Toll System: नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती; आता सॅटेलाइटद्वारे टोल वसुली होणार नाही

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Mumbai : मुंबईतील स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडलं लाखोंचं घबाड, पैसे नेमके कुणाचे? पोलिसांना समजताच...

SCROLL FOR NEXT