लग्नसराईत सोनं महागलं, चांदीच्या दरानंही उसळी घेतली; आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याचा भाव किती?

Gold Prices Hit Record High: ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२६,२८० रूपये मोजावे लागतील.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary
  • ११ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावानं उच्चांक गाठला.

  • २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात २,४६० रूपयांची वाढ.

  • चांदीच्या दरातही कमालीची वाढ.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवाळीत सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीनंतर उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या भावात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. आज सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात २४,६०० रूपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला निश्चितच फटका बसणार आहे. आज सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ झाली आहे? पाहूयात.

आज ११ नोव्हेंबर २०२५. सोन्याच्या दरानं आज उसळी घेतली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २,४६० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२६,२८० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २४,६०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला १२,६२,८०० रूपये मोजावे लागतील.

Gold Rate Today
मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्यामुळे २ राष्ट्रवादी एकत्र, कोल्हापूरचं राजकारण फिरलं

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २,२५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१५,७५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २२,५०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,५७,५०० रूपये मोजावे लागतील.

Gold Rate Today
शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

२४ सह २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,८४० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला ९४,७१० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १८,४०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ९,४७,१०० रूपये मोजावे लागतील.

Gold Rate Today
विद्यार्थ्याचं हैवानी कृत्य; ४० वर्षीय महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न, नकार देताच डोक्यात विळा घातला

सोन्याच्या दरासह चांदीच्या भावानंही उसळी घेतली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रूपयांची वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदीसाठी आपल्याला १६० रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीच्या दरात ३००० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदीसाठी आपल्याला १,६०,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com