Anchor Google
देश विदेश

Heatwave: गर्मीने सारे बेहाल! उष्माघाताची बातमी देताना अँकरला भोवळ; प्रक्षेपण अर्ध्यातच थांबवलं, Video

Heatwave Effect On Anchor: उन्हाळा सुरु झाला आहे. उकाड्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक राज्यात तापमान तर ४५ अंश सेल्सियसपर्यंत आहे. यामुळेच देशातील लोकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. असाच त्रास कोलकत्यामध्ये दूरदर्शन शाखेत अँकरला सहन करावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा सुरु झाला आहे. उकाड्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक राज्यात तापमान तर ४५ अंश सेल्सियसपर्यंत आहे. यामुळेच देशातील लोकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. असाच त्रास कोलकत्यामध्ये दूरदर्शन शाखेत अँकरला सहन करावा लागला आहे.

कोलकत्यातील दूरदर्शन शाखेतील अँकर उष्म लहरींचे अपडेट्स वाचत असतानाच बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे.

लोपामुद्रा असे या अँकरचे नाव आहे. अँकर टीव्हीवर उष्माघातासंबंधित बातम्यांचे वाचन करत होत्या. त्याचदरम्यान त्या बेशुद्ध झाल्या. लोपामुद्रा या दूरदर्शन पश्चिम बंगालच्या शाखेत काम करतात. उन्हाच्या त्रासाने त्यांना त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोपामुद्रा सिन्हा यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, लाईव्ह न्यूज वाचताना माझे ब्लड प्रेशर कमी झाले आणि मी बेशुद्ध पडली. मला खूप दिवसापासून अस्वस्थ वाटत होते. पाणी प्यायल्यावर मला बरं वाटेल असं वाटलं होतं. मात्र, तसं काहीच झालं नाही.

लोपामुद्रा यांनी सांगितले की, मी कधीच बातम्या वाचताना पाणी घेऊन बसत नाही. बातमी १० मिनिटांची असो किंवा अर्ध्या तासाची. मी फ्लोअर मॅनेजरकडे बोट दाखवून पाण्याची बाटली मागितली. परंतु मी पाणी पिऊ शकले नाही. कारण मी ऑन एअर होती.

उष्माघाताचा त्रास देशासह राज्यात अनेक ठिकाणी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खूप काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सतत पाणी पिऊन स्वतः ला हायड्रेट ठेवायला हवे. उन्हाळ्यात शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास तुम्ही तुमच्याजवळ काही गोड पदार्थ ठेवावे. जेणेकरुन चक्कर आल्यावर तुम्ही ते खाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : ३६ किलोमीटर लांब भिंत! 'या' किल्ल्याची भव्य रचना पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा

काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना अटक; राजकारणात खळबळ

PF खात्याची संपूर्ण माहिती आता WhatsApp वर! ही प्रोसेस करा फॉलो अन् मिळवा PF Balance, Claim Status आणि KYC ची माहिती

Wednesday Horoscope : पैसा, धनलाभ आणि प्रगतीचा योग! ‘या’ ७ राशींवर लक्ष्मीची कृपा, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT