Shreya Maskar
कुंभलगड किल्ला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब अखंड भिंतीसाठी प्रसिद्ध आहे. हिला 'मेवाडची ग्रेट वॉल' म्हटले जाते. ती ३६ किलोमीटर लांब आहे.
कुंभलगडकिल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी १५ फुटांपर्यंत रुंद आहे आणि ती इतकी रुंद आहे की त्यावर एकाच वेळी आठ घोडेस्वार शेजारी-शेजारी चालू शकतात.
कुंभलगड किल्ला मेवाडचे महान राजा आणि योद्धा महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान आहे. हे इतिहासातील खूप महत्त्वाचे ठिकाण आहे.
कुंभलगड किल्ला हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. १५ व्या शतकात राणा कुंभा यांनी बांधलेला हा किल्ला 'राजस्थानचे डोंगरी किल्ले' या श्रेणीतील एक संरक्षित वारसा स्थळ आहे.
बादल महलाला 'ढगांचा महाल' असेही म्हणतात. किल्ल्याच्या अगदी वरच्या भागात असलेल्या या वास्तूतून अरवली पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते.
कुंभलगड किल्ल्याच्या विशाल संकुलात ३६० हून अधिक प्राचीन हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. येथे शांत आणि मंगलमय वातावरण अनुभता येते.
किल्ल्याची रचना अरवली पर्वतरांगांमधील अनियमित कडा आणि शिखरांचा अचूक मागोवा घेत या किल्ल्याची बाह्यरेषा व प्रचंड संरक्षक भिंती वळणे घेत आणि नागमोडी वळणांनी पुढे जातात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.