Loksabha Election: काँग्रेसकडून नवीन उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या राज्यातील नेत्यांना मिळाली संधी?

Congress Candidates New List: काँग्रेस पक्षाकडून नवीन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. काँग्रेसच्या नव्या यादीत आंध्र प्रदेश आणि झारखंड मधील जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
Congress Candidates New List CEC Meeting
Congress Candidates New List CEC Meetingx twitter

Loksabha Election Congress Candidates New List in CEC:

काँग्रेस पक्षाने आपल्या नवीन उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत काँग्रेसने आंध्रप्रदेश आणि झारखंडमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केलीय. काँग्रेसने झारखंडमध्ये धक्कातंत्र स्वीकारत गोड्डामधून दीपिका सिंह पांडेऐवजी प्रदीप यादवला उमेदवारी दिलीय.

काँग्रेस पक्षाने आज म्हणजेच २१ एप्रिल रोजी सीईसीची बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी अनुपस्थितीत होते. राहुल गांधी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या बैठकीत आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या जागांसाठी उमेदवारांचे निश्चित करण्यात आले.

सर्वांचे एकमत होत काँग्रेसने यादी जाहीर करत उमेदवारांची नावे घोषित केली. काँग्रेसच्या या नव्या यादीत उत्तर भारतातील तीन राज्यांचा समावेश आहे. मात्र अजून उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवारी घोषित करण्यात आली नाहीये. यामुळे या जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळते हा जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत

या जागांची यादी कधी घोषित होते याची वाट अनेक उमेदवार दीर्घकाळपासून पाहत आहेत. यावेळीही काँग्रेसने या या बैठकीत या जागांवरील सस्पेन्स कायम ठेवलाय. याशिवाय काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील 2 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

Congress Candidates New List CEC Meeting
PM Modi: 'जे जिंकू शकत नाही, त्यांनी मैदान सोडलं', PM मोदींनी सोनिया गांधींना केलं लक्ष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com