डोनाल्ड ट्रम्प यांचा घूमजाव, भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी नाही 
देश विदेश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक कोलांटी; म्हणाले, भारत-पाक मध्यस्थी केली नाही, पण...

India-Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थीचं क्रेडिट घेणाऱ्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता घूमजाव केले आहे.

Nandkumar Joshi

भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीचं श्रेय घेत स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी या वक्तव्यावरून कोलांटी मारली. मी दोन्ही देशांमधील वादात मध्यस्थी केली नाही. मी केवळ मदत केली आहे, असं ट्रम्प म्हणाले. या भूमिकेमुळं ट्रम्प यांनी पुन्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

भारत - पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळं अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आश्चर्यकारक विधान केलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत केली होती, असं ट्रम्प म्हणाले. त्याचवेळी त्यांनी या मुद्द्यात थेट मध्यस्थी केल्याचेही स्पष्टपणे सांगितले नाही.

ट्रम्प नेमके काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात भारत-पाकिस्तान यांच्यात केलेल्या मध्यस्थीबाबत विधान केले. दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केल्याचे बोलत नाही; पण मागील आठवड्यात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत जो तणाव अधिक धोकादायक पातळीवर पोहोचला होता, तो निवळण्यास मदत केली, असं ट्रम्प म्हणाले.

भारत-पाकिस्तानमध्ये १० मे रोजी युद्धबंदी

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं हवाई हल्ल्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तान बिथरला आणि भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद चिघळला होता.

पाकिस्तानच्या विनंतीनुसार, १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धीबंदीसाठी तयार झाले, असं सांगतानाच ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे अभिनंदनही केले होते.

ट्रम्प यांचा दावा भारतानं खोडला

दोन्ही देशांमधील मध्यस्थीचा ट्रम्प यांचा दावा भारतानं खोडून काढला. व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाली, असं ट्रम्प म्हणाले होते. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या वेळी भारत आणि अमेरिका यांच्यात कोणत्याची चर्चेवेळी व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता, असं भारतानं ठासून सांगितलं. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अमेरिकी नेते संपर्कात होते, पण व्यापाराच्या मुद्द्यावर कुठलीही चर्चा झाली नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT