Donald Trump: जागतिक फेकू 'ट्रम्प तात्या', आतापर्यंत काय केली फेकाफेकी? तुम्हीच बघा

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प तात्या. अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणजी राष्ट्राध्यक्ष. तात्या प्रेसिडेंट तर हायत पण त्यांना बनायचं हा ग्रेट प्रेसिडेंट. पण तात्याला जडलाय खोटं बोलायचं छंद.
Donald Trump: जागतिक फेकू 'ट्रम्प तात्या', आतापर्यंत काय केली फेकाफेकी? तुम्हीच बघा
Donald TrumpSaam Tv
Published On

खोटं बोलण्याचा नोबेल असता तर डोनाल्ड ट्रम्प तात्याला नक्की भेटला असता. हे आम्ही का म्हणतोय. आणि ट्रम्प तात्यानं एवढी काय फेकाफेकी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

डोनाल्ड ट्रम्प तात्या. अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणजी राष्ट्राध्यक्ष. तात्या प्रेसिडेंट तर हायत पण त्यांना बनायचं हा ग्रेट प्रेसिडेंट. पण तात्याला जडलाय खोटं बोलायचं छंद. तात्या निबर खोटं बोलायला लागल्यात. खोटं बोलायला मधला एखादा नोबल असता तात्याच्या घरी ढिग लागला असता. फेकण्यात तर तात्या माहिर त्यांना फेकू ट्रम्प तात्या ही नावच पडलंय.

खोटं बोलणं तात्याचा जन्मसिद्ध अधिकार. त्या त्या काय सोडायला तयार नाही. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तणावाचं वातावरण. तात्यांना साधला डाव आणि सोडलं खोटं पिल्लू. तात्या म्हणालं रात्रभर माझ्या प्रशासनानं भारत आणि पाकिस्तानच्या प्रशासनासोबत संवाद साधला. म्हणालं मिसाइलपेक्षा आपण चांगल्या गोष्टीची देवाण-घेवाण करू. म्हजी व्यापार करू तात्या पुढे म्हणाले माझ्या एका वाक्यावर दोन्ही देश सहमत झालं अन् आणि शांती कायम झाली. वा तात्या वा. खोटेश्वर महाराजांचं उष्ट पाणी पिलता का काय?

Donald Trump: जागतिक फेकू 'ट्रम्प तात्या', आतापर्यंत काय केली फेकाफेकी? तुम्हीच बघा
Donald Trump News : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प युग आलं; त्या 7.25 लाख भारतीयांचं टेन्शन वाढलं, कारण काय?

तात्याचं खोटं ऐकून आपलं विदेश मंत्रालय संतापलं अन् थेट तात्याला फायलावर घेवून हिशोब केला. विदेश मंत्रालय थेट म्हणाले काश्मीरच्या मुद्द्यावर आम्हाला तिसऱ्या पक्षाकडून मध्यस्थीची गरज नाय... गोरा पान असणारा तात्या एका दणक्यात काळवंडला. आता तुम्हीच बघा की फेकू ट्रम्प तात्या कवा कवा खोटं बोलल्यात...

तात्यांना दावा केलाय युक्रेनला 500 बिलियन डॉलरच कर्ज दिलंय... पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त 124 बिलियन डॉलर्स कर्ज दिलंय. तात्याचं दुसरं खोटं ऐकायचं आहे का? ऐका तात्या म्हणत्यात मला इतिहास सगळ्यात जास्त मत पडली आणि निवडून आलू. पण तात्या ती ती जॉर्ज बूश नाना आठवत्यातं का? त्यांना 2005 मध्ये 92 टक्के मत पडली होती तुमच्यापेक्षा जास्त.

Donald Trump: जागतिक फेकू 'ट्रम्प तात्या', आतापर्यंत काय केली फेकाफेकी? तुम्हीच बघा
Donald Trump: ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका! टॅरिफमध्ये २६ टक्क्यांनी वाढ; तेल, फोन,सोन्याच्या किंमती महागणार

आता खोटं नंबर तीन ऐका तात्या एकदा म्हणालं जानेवारी महिन्यात मी सहा नागरिकांना हमसच्या कैद्यातून सोडवले आणि बायडन आण्णानं एक बी सोडवला नाय . पण खरं असं हाय 2023 मध्ये हामासनं 105 नागरिकांना सोडून दिलं होतं. शेवटी ही डोनाल्ड ट्रम्प तात्या हायत. पारावर बसून झाल्या झाल्या गप्पा मारणं. आन् झाक्या हाणणं तात्याला लय आवडीचं. पण तात्या ही भारत हाय जागेवर हिशोब करतू.... कळलं का?

Donald Trump: जागतिक फेकू 'ट्रम्प तात्या', आतापर्यंत काय केली फेकाफेकी? तुम्हीच बघा
Donald Trump: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीआधी अमेरिकेनं दिली होती धमकी; डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com