Donald Trump News : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प युग आलं; त्या 7.25 लाख भारतीयांचं टेन्शन वाढलं, कारण काय?

Donald Trump latest Update : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बेकायदा स्थलांतरितांबाबत त्यांनी घोषणा केली. त्यामुळं अमेरिकेत राहणाऱ्या साधारण सव्वासात लाख भारतीयांची धाकधूक वाढली आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प युग आलं; त्या 7.25 लाख भारतीयांचं टेन्शन वाढलं, कारण काय?
Donald Trump US presidentsaam tv
Published On

तब्बल चार वर्षांनंतर अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरू झालं आहे. बलाढ्य अमेरिकेच्या अध्यक्षपदाची त्यांनी शपथ घेतली आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होताच त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळं संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. बेकायदा स्थलांतरितांबाबत त्यांनी केलेल्या एका घोषणेनं अमेरिकेत राहणाऱ्या तब्बल सव्वासात लाख भारतीय नागरिकांवर टांगती तलवार राहणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट बेकायदा स्थलांतरितांच्या मुद्द्याला हात घातला. बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांवर बंदी घालण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या अंदाजे सव्वासात लाख भारतीय नागरिकांची धाकधूक वाढली आहे.

पीयू रीसर्च सेंटरच्या २०२२ च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांची एकूण संख्या साधारण १० कोटी १० लाखांच्या घरात आहे. त्यातील भारतातून येणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास सव्वासात लाख इतकी आहे. २०२२ मधील अमेरिकन कम्युनिटी सर्व्हेनुसार ही आकडेवारी समोर आली होती. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंदाजानुसार, अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांची संख्या ही साधारण दोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. त्यामुळं ट्रम्प यांनी सत्तेत येताच बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित केला असून, आता त्यांनी अवैध स्थलांतरितांवर बंदीची घोषणा केली.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प युग आलं; त्या 7.25 लाख भारतीयांचं टेन्शन वाढलं, कारण काय?
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा; सर्व ३४ आरोपांमधून निर्दोष मुक्तता, काय आहे संपूर्ण प्रकरण?

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात येणार आहे. बेकायदा स्थलांतरितांना रोखलं जाईल. सरकार लाखो बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या देशात पाठण्यासाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे.'

ट्रम्प यांच्या या घोषणेमुळं अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांवर टांगती तलवार राहणार आहे.

अमेरिकेत कोणत्या देशाचे किती अवैध स्थलांतरीत?

मेक्सिको - अंदाजे ४० लाख बेकायदा स्थलांतरित

एल साल्व्हाडोर - साडेसात लाख

भारत - सव्वासात लाख

(ही सर्व आकडेवारी एका सर्व्हेच्या हवाल्याने देण्यात आली आहे.)

दरम्यान, मेक्सिको आणि एल साल्व्हाडोरनंतर अमेरिकेत सर्वाधिक अवैध स्थलांतरित भारतातील आहेत. अमेरिकेत मेक्सिकोतील अवैध स्थलांतरितांची संख्या ४० लाख, एल साल्व्हाडोरमधून ७ लाख ५० हजार आहेत. मेक्सिकोतून अवैधरित्या अमेरिकेत आलेल्यांची संख्या साधारण ३७ टक्क्यांवर आहे. अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी अवैध स्थलांतरितांचे संख्या ३.३ टक्के इतकी आहे.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प युग आलं; त्या 7.25 लाख भारतीयांचं टेन्शन वाढलं, कारण काय?
Donald Trump Oath Ceremony: अमेरिकेत पुन्हा एकदा 'ट्रम्प पर्व'; 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com