Donald Trump Tariff India Narendra Modi x
देश विदेश

Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

Donald Trump Tariff India : पंतप्रधान मोदींना मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर केली. दुसऱ्या बाजूला, त्यांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावण्याचे युरोपियन युनियनला सुचवले आहे.

Yash Shirke

  • रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचे ट्रम्प यांचे युरोपियन युनियनला आवाहन.

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना मित्र म्हणत पोस्ट केली, पण भारतावर १००% टॅरिफ सुचवून दुटप्पीपणा दाखवला.

  • भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे तणावाची स्थिती निर्माण.

Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जर रशियावर दबाव आणायचा असेल, तर भारतावर १०० टक्के टॅरिफ कर लादला पाहिजे असे ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला (EU) सांगितले आहे. एका बाजूला भारत आणि अमेरिका मित्र आहेत, दोन्ही देशात व्यापारावर चर्चा होईल असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला भारतावर १०० टक्के टॅरिफ लादला हवा असे सांगायचे. या कृतीवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे दुटप्पी वर्तन समोर आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापाराशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसात माझे चांगले मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा होणार आहे. यासाठी मी खरंच उत्सुक आहे. या संवादाद्वारे दोन्ही देशांना व्यापारासंबंधित प्रश्न सोडवणे सोपे होईल', असे म्हटल्याचे पाहायला मिळते.

https://truthsocial.com/@realDonaldTrump/115176472700835865

दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादण्याबाबत सूचना केल्या. जोपर्यंत भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर टॅरिफ लादत रहा, असे ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला सांगितल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. या विषयावर ट्रम्प यांच्या एका अधिकाऱ्याने 'आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पण आमचे युरोपियन भागीदार जो निर्णय घेतील', आम्ही तेच करु असे सांगितले.

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. टॅरिफच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती होती. ट्रम्प यांनी सुरुवातीला भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला होता. त्यानंतर त्यांनी त्यात आणखी २५ टक्क्यांची वाढ केली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने टॅरिफचा तणाव सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

भारताचा विद्यार्थी एकटा नाही! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृतिस्थळी

Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

SCROLL FOR NEXT