PM Modi  Saam Tv
देश विदेश

Donald Trup Rally Attack: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, PM मोदींवरही रॅलीदरम्यान झाला होता हल्ला; भाजप नेत्यांनी केली आठवण

PM Narendra Modi Rally Attack: 2013 मध्ये पीएम मोदींच्या प्रचार रॅलीमध्ये ६ बॉम्बस्फोट करण्यात आले होते. या स्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता तर ८९ जण जखमी झाले होते.

Priya More

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर शनिवारी गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आता या घटनेची तुलना २०१३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाशी करण्यात आली आहे. या प्रचार रॅलीमध्ये लागोपाठ ६ बॉम्बस्फोट करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर भाजपच्या एका नेत्याने २०१३ च्या या घटनेची आठवण केली आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पीएम मोदींच्या २०१३मधील प्रचार रॅलीमधील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, 'कधीही विसरू नका... २०१३ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना पाटणा येथे त्यांच्या सभेत सहा स्फोट झाले होते. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोटाद्वारे त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता.'

जागतिक नेत्यांवरील हल्ल्यांचा निषेध करत अमित मालवीय असे म्हणाले की, 'जग जास्तीत जास्त असुरक्षित होत आहे. शिंजो आबे, नंतर स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेले हल्ले आम्ही पाहिले आहेत. धोका खरा आहे. डाव्या विचारसरणीचे नेटवर्क काम करतात पण ते लोकांची बदनामी करत आहेत. शक्तिशाली नेते, त्यांना पाडण्याचा कट रचत आहेत जेणेकरून ते निवडून आलेल्या सरकारांवर नियंत्रण ठेवू शकतील आणि त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करू शकतील.'

दरम्यान, २७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर प्रचार रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी मंचावर उभे असताना ६ साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता तर ८९ जण जखमी झाले होते. याप्रकरणात एनआयए कोर्टाने बंदी घातलेल्या एसआयएमआयच्या ९ सदस्यांना दोषी ठरवले. यापैकी ४ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फकरुद्दीन या दहाव्या आरापींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT