अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी (१२ जुलै रोजी) लग्नबंधनात अडकले. मुंबईतल्या बीकेसीमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन कल्चरल सेंटरमध्ये त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर काल (१३ जुलै) शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. त्याप्रमाणेच देशातील अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी नव वर- वधूंना पंतप्रधानांनी शुभ आशीर्वाद देत भावी आयुष्यासाठी दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी लग्नाला उपस्थिती लावल्यानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या, विरल भयानी या पापाराझी इन्स्टाग्राम चॅनलवर अनंत- राधिका यांच्या 'शुभ आशीर्वाद' कार्यक्रमादरम्यानचे अनेक व्हिडिओ आणि फोटो त्यांनी शेअर केले आहेत. काल पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी पंतप्रधान यांच्या ग्रँड एन्ट्रीवेळी अख्खं अंबानी कुटुंब उपस्थित होतं.
सध्या पंतप्रधानांच्या येण्यामुळे अंबानीच्या लग्नाची आणखीनच सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ह्या लग्नाची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्नामध्ये हजेरी लावताच सर्वांनी उभे राहून त्यांचं स्वागत केलं. तसंच, स्वतःच्या जागेवर जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांना हस्तांदोलन केले. नववधू आणि नववराने नरेंद्र मोदी यांचे आशीर्वादही घेतले. यासोबतच पंतप्रधानांनी नववधूला अनेक भेटवस्तू दिलेल्या आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर मुकेश अंबानी आणि नीता अंबानीही होते.
अत्यंत शाही पद्धतीच्या ह्या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील, जगभरातील, अत्यंत नावाजलेली, देशी-परदेशी राजकीय मंडळी अनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ते काल पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यापूर्वी ते लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये आले होते. त्यापूर्वी ही ते अनेकदा उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.