Donald Trump Alexander Duncan x
देश विदेश

Donald Trump : हनुमान खोटा देव, आपण ख्रिश्चन आहोत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेत्याने तोडले अकलेचे तारे

Alexander Duncan : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षातील नेते अलेक्झांटर डंकन यांनी हिंदूंच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे डंकन यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Yash Shirke

  • टेक्सासमधील हनुमानाच्या मूर्तीवर ट्रम्प पक्षातील नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य.

  • सोशल मीडियावर ‘खोटा हिंदू देव’ म्हणत नेत्याने व्हिडीओ पोस्ट केला.

  • या वक्तव्यामुळे अमेरिकन हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Alexander Duncan Statement : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये रामभक्त हनुमानाची भव्यदिव्य मूर्ती आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये या मूर्तीची/पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या महाकाय मूर्तीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. टेक्सास येथील रिपब्लिकन नेते अलेक्झांटर डंकन यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'आपण टेक्सासमध्ये खोट्या हिंदू देवाची खोटी मूर्ती का उभारू देत आहोत? अमेरिका हे एक ख्रिश्चन राष्ट्र आहे' असे म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेतील हिंदूंनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. हे सर्वजण आता डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पक्षावर संतावर आहेत. याला कारण ठरले आहे, रिपब्लिकन पक्षाचे नेते अलेक्झांटर डंकन यांनी केलेले वक्तव्य. डंकन यांनी भगवान हनुमान यांना 'बनावट देवता' असे म्हटले आहे.

अलेक्झांटर डंकन हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या एमएजीए म्हणजेच 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' चळवळीचे खंदे समर्थक आहेत. अन्य धर्मीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत असतात. डंकन यांनी मुस्लिमांच्या विरोधात अनेकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी अमेरिकेतून मुस्लिमांना हद्दपार करण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी हनुमानाच्या मूर्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अलेक्झांटर डंकन यांच्या विधानामुळे अमेरिकन हिंदू संतप्त झाले आहेत.

डंकन यांनी केलेल्या विधानाचा हिंदू अमेरिकन फाउंडेशन (एचएएफ) या संघटनेने निषेध केला आहे. एचएएफने डंकन यांना हिंदूविरोधी आणि प्रक्षोभक म्हटले आहे. या प्रकरणी एचएएफच्या अधिकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्षाला तक्रार केली आहे आणि घटनेची अंतर्गत समीक्षा करण्याची विनंती केली आहे. डंकन यांना शिस्त लावा असे म्हणत एचएएफने एक्स पोस्ट शेअर केली आहे. फक्त हिंदूच नाही, पण अन्य धर्मीय अमेरिकन नागरिकांनीही या गोष्टीचा निषेध केला आहे.

टेक्सासमधील शुगल लँडमध्ये भगवान हनुमानाची एक महाकाय मूर्ती बांधण्यात आली आहे. या मूर्तीला 'स्टॅच्यू ऑफ युनियन' म्हणतात. श्री अष्टलक्ष्मी मंदिरात हनुमानाची ९० फूट उंच कांस्य मूर्ती आहे. ही मूर्ती भक्ती, शक्ती आणि एकतेचे प्रतीक म्हणून समर्पित आहे. या मूर्तीवर वादग्रस्त टिप्पणी केल्याने अलेक्झांटर डंकन यांच्यावर टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, भाजपला धक्का, हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

Accident: भयंकर अपघात! घाटात ओव्हरटेकचा प्रयत्न, ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Baahubali: The Epic Collection : बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'चा धुराळा; ४ दिवसांत बंपर कमाई अन् रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Buldhana News: अंगणवाडीत स्मशानभूमी की स्मशानभूमीत अंगणवाडी...?

SCROLL FOR NEXT