Donald Trump Saam Tv
देश विदेश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी; नव्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला तडा जाणार?

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या नव्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला तडा जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नवीन धमकी दिली आहे.

ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात अधिक टॅरिफ लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारताला धमकी दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा टॅरिफ वाढवण्याचे संकेत दिले आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याबाबत योजना आखण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला २५ टक्के टॅरिफ लागू केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारताला सुनावलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, 'भारत रशियाकडून फक्त तेल खरेदी करत नाही. तर चांगला नफा मिळवण्यासाठी खुल्या बाजारात विक्री करत आहे. त्यांना रशियाच्या युद्ध मशीनमुळे किती जणांचा मृत्यू होत आहे, याच्याशी त्यांना फरक पडत नाही'.

भारतावर २५ टक्क्यांचा टॅरिफ लागू केला. त्यानंतर रशियासोबत व्यापार करण्यावरही दंड लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, 'मला काहीही फरक पडत नाही की, ते एकत्र आपली 'मृत अर्थव्यवस्था' गर्तेत कशी नेतात'.

ट्रम्प यांनी बुधवारी ब्रिक्स समूह आणि भारतासोबतच्या तुटीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की, 'आम्ही सध्या चर्चा करत आहोत. त्यात ब्रिक्सचा मुद्दाही आहे. ब्रिक्स समूह हा अमेरिकेच्या विरोधी देशांता गट आहे. भारत देखील त्याचा सदस्य आहे. हे अमेरिकेच्या चलन, व्यापारावर हल्ला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT