Maharashtra Politics : शिंदे गटाचा बडा नेता अडचणीत; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय आहे संपूर्ण प्रकरण?

arjun khotkar news : शिंदे गटाचा बडा नेता अडचणीत सापडला आहे. त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
arjun khotkar news update
arjun khotkar news Saam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कैलास गोरंट्याल आणि शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दोन्ही नेत्यांच्या वादादरम्यान शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी टीका करताना खाटीक समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खोतकर यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

arjun khotkar news update
Shirish Gawas : लोकप्रिय युट्यूबरचा अकाली मृत्यू; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, चाहत्यांवर शोककळा

अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका करताना खाटीक समाजाविषयी चुकीचं वक्तव्य केल्याने त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्ष करण इंगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

arjun khotkar news update
Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्षांनी बारामती शहर पोलिस ठाण्यासह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं. या निवेदनात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

arjun khotkar news update
Mumbai local train Dispute : तिकीटावरून लोकलमध्ये वाद; रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड

हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्ष करण इंगुले यांनी म्हटलं की, 'आज आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशनला आलो होतो. अर्जुन खोतकर यांच्या नावे गु्न्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे. अर्जुन खोतकर हे माहिती न घेता खाटीक समाज किती वाईट आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी. त्यांना शिक्षा देऊन खाटीक समाजाला न्याय मिळवून द्यावा, असं आम्ही अर्जात म्हटलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com