Donald Trump News  Saam tv
देश विदेश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची दुतोंडी भूमिका; भारतावर लावला ५० टक्के टॅरिफ अन् रशियाशी केली सीक्रेट डील

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांचं दुपट्टी धोरण जगासमोर आलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने या बाबत दावा केला आहे.

Vishal Gangurde

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लागू

दुसरीकडे रशियाशी गुप्तपणे तेल खरेदी करार

एक्सॉन मोबिल आणि रोसनेफ्ट यांच्यात बोलणी ट्रम्प यांच्या मध्यस्थीने

अमेरिकेच्या धोरणामुळे भारताच्या व्यापारावर मोठा परिणाम

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुतोंडी भूमिका जगासमोर आली आहे. ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर आक्षेप घेतला. मात्र, अमेरिका रशियाशी एक करार करत असल्याची माहिती मिळत आहे. रशियाच्या तेल खरेदीवरून अमेरिकेने भारतावर दुप्पट टॅरिफ लागू केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दुटप्पी धोरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या रिपोर्टनुसार, अमेरिका रशियाकडून ऊर्जा खरेदीसाठी करार करत आहे. रिपोर्टनुसार, अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्वादिमीर पुतिन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की, 'रशिया आणि अमेरिका मिळून व्यापार करू शकतो'.

पुतिन यांच्यानंतर ट्रम्प म्हणाले की, 'आम्ही व्यापार करण्यासाठी उत्सुक आहोत'. परंतु दोन्ही नेत्यांनी सार्वजनिकरित्या करारविषयी बोलण्याचे टाळले. दोन्ही देशांच्या ऊर्जा कंपन्यांनी रशियाच्या सुदूर पूर्वेकडील किनाऱ्यावर असलेल्या तेल आणि वायू क्षेत्रांमधून तेल काढून परस्पर व्यापार पुन्हा सुरू करण्याची रूपरेषा आधीच तयार केली होती, या कराराविषयी बोलण्याचे टाळले.

अमेरिकेत सर्वात मोठी ऊर्जा कंपनी एक्सॉन मोबिलने रशियातील सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टसोबत गुपीतपणे बोलणं सुरु केलं आहे. ही बोलणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने करण्यात आली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे.

अमेरिकेने २५ टक्के अधिकचा टॅरिफ भारतावर लागू केला आहे. भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लागू केला आहे. यामुळे भारताच्या व्यापारावर परिणाम होणार आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतातील अब्जो डॉलरच्या व्यापारावर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दुटप्पी धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

SCROLL FOR NEXT