Vijay Thalapathy  Saam tv
देश विदेश

MLA Arrest : राजकारणात मोठा भूकंप! विरोधी पक्षाच्या आमदाराला रात्रीतून अटक, नक्की काय घडलं?

G V Markandeyan, DMK MLA Arrest : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात कथित धमकीवजा वक्तव्य केल्याप्रकरणी डीएमकेचे आमदार जी. व्ही. मार्कंडेयन यांना पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Namdeo Kumbhar

DMK MLA G V Markandeyan Arrest : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि त्याच्या 'तमिळ वेत्री कळघम' पक्षाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणे डीएमके (DMK) आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. विजय यांना थेट धमकी दिल्याच्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी डीएमकेचे आमदार जी. व्ही. मार्कंडेयन यांना अटक केली आहे.

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मार्कंडेयन यांनी विजय यांच्यावर जोरदार टीका करत थेट धमकावले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विजय यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आमदाराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे सध्या तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

कोविलपट्टी येथील एका जाहीर सभेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या विरोधात कथित धमकीवजा आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी विलाथिकुलमचे आमदार जी. व्ही. मार्कंडेयन यांना अटक केली. भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून, आमदारांच्या वक्तव्यांवरून टीका होत आहे.आज पोलीस पहाटे विलाथिकुलम येथील मार्कंडेयनच्या निवासस्थानी पोहोचले आणि ताब्यात घेतले.

आमदाराच्या समर्थकांनी अटकेचा निषेध केला, घोषणाबाजी केली आणि पोलिसांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना हटवून आमदाराला घेऊन गेले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्कंडेयन यांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. या अटकेमुळे राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे.

दरमयान, अशाच एका प्रकरणात याआधीही डीएमकेचे तिरुचेंदूरच्या आमदार अनिता राधाकृष्णन यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आणि हिंसाचार भडकवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर सोडण्यात आले होते. याच मुद्द्यावरून डीएमकेचे आणखी एक आमदार मार्कंडेयन यांच्या अटकेमुळे टीव्हीके आणि डीएमके यांच्यातील थेट संघर्ष आणखी वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; खात्यात कधी पैसे येणार?

सोनम वांगचुक यांची पहिली अट मान्य; हायकोर्टाचे थेट केंद्र सरकारला आदेश

Shubha Godbole: मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर; 'केमो कर्ल्स' पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

Mumbai CJP Protest : अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात, Video पोस्ट करत म्हणाली "अतिशय लाजिरवाणी गोष्ट"

SCROLL FOR NEXT