Software Engineer increment Saam TV
देश विदेश

सॉफ्टवेअर इंजिनिअरला फक्त ९ रूपयांची पगारवाढ, नोटीस पिरियडमुळे नोकरीही मिळेना, कॉर्पोरेटचं धक्कादायक वास्तव

IT salary increment : एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला फक्त ९ रुपयांची पगारवाढ मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ९० दिवसांच्या नोटीस पिरियडमुळे नोकरी बदलण्याची अडचण येते.

Namdeo Kumbhar

Software Engineer increment, notice period issue : पुणे, मुंबई अथवा कोणत्या शहरातील एखाद्या दुकानात, टपरीवर एका कटिंग चहाची किंमत आता १० ते १५ रुपये आहे. पण एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ फक्त ९ रुपये मिळालं आहे. हो, बरोबर वाचलंय! पगारवाढीच्या नावाखाली झालेली ही क्रूर थट्टा आणि २ ते ३ महिन्याच्या 'नोटीस पिरियड'च्या जाचात अडकलेल्या एका तरुणाची व्यथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तरूणामुळे कॉर्पोरेट जगतातील धक्कादायक वास्तव समोर आलेय.

एनसीआरमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने रेडिटवर पगारवाढ आणि नोकरीसंबंधीच्या चिंता व्यक्त केली. हा इंजिनिअर एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) काम करतो. २०२५ मध्ये त्याच्या पगार फक्त ९ रुपयांनी वाढला होता. तर २०२६ मध्ये पगारात कोणतीही वाढ होणार नाही. या पगारवाढीमुळे इंजिनिअरने नाराजी व्यक्त केली. इंजिनिअरच्या पोस्टमुळे चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

संबंधित इंजिनिअरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, वर्षाच्या शेवटी मिळालेली पगारवाढ (Increment) पाहून धक्काच बसला. कंपनीने त्याच्या पगारात महिन्याला फक्त ९ रुपयांची वाढ केली. ही वाढ म्हणजे त्याच्या कामाचा अपमान असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. "एवढ्या पगारात मी काय करणार? साधी चहाची तल्लफही यात भागणार नाही," अशा शब्दांत नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

नोटीस पिरियडची अडचण

फक्त कमी पगारवाढ झाला म्हणून इंजिनिअर वैतागला नाही. तर कंपनीचा 'नोटीस पिरियड' हा त्याच्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. या इंजिनिअरला ही कंपनी सोडून दुसरीकडे जायचे आहे. पण कंपनीचा नोटीस पिरियड ९० दिवसांचा (३ महिने) आहे. बहुतेक नवीन कंपन्यांना तातडीने जॉईन होणारे उमेदवार हवे असतात. ३ महिने थांबायला कोणीच तयार नसल्यामुळे त्याला दुसरीकडे चांगली नोकरी मिळवणे कठीण झाले आहे.

नेटकऱ्यांचा संताप -

इंजिनिअर तरूणाची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. "ही पगारवाढ नसून कर्मचाऱ्याला हाकलून देण्याचा हा एक प्रकार आहे," असे अनेकांनी म्हटले आहे. तसेच ९० दिवसांच्या नोटीस पिरियडमुळे कर्मचाऱ्यांचे करिअर कसे धोक्यात येते, यावरही अनेकांनी मत व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाने मेहुण्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, वाचवायला गेलेल्या वहिनीचाही मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रेड अलर्टमुळे उल्हासनगरातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बनला 'मृत्यूचा रस्ता'; विवळवेढे उड्डाणपुलाच्या मधोमध पडलं भगदाड

Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला

Mumbai School Holiday: मुंबईतील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी, BMC कडून मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT