दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील किशनगडमधून एका खासगी विमान कंपनीमध्ये पालयट म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय मोहित प्रियदर्शीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहित स्पाय कॅमेरा वापरून महिलांचे अश्लिल व्हिडीओ बनवायचा. त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना ७४ वेगवेगळ्या तरुणींचे व्हिडीओ सापडले आहेत.
पोलिसांनी मोहितला अटक करत त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान मोहितने व्हिडीओ काढण्यामागचे जे कारण सांगितले त्याने पोलिसही चक्रावले. हे व्हिडीओ त्याने कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले नाही. त्याने ते फक्त आपल्या मोबाईलमध्ये ठेवले होते. स्वत:च्या समाधानासाठी तो हे व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. हे प्रकरण ३० ऑगस्ट रोजी समोर आले होते .
३० ऑगस्टला रात्री १०.२० वाजताच्या सुमारास किशनगड गावातील शनी बाजारात एका तरुणीने पाहिले की एक अज्ञात व्यक्ती लाईटरसारख्या उपकरणाने तिचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या तरुणीने किशनगड पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. किशनगड पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले.
पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले आणि संशयिताचा फोटोही शेअर केला. पोलिसांनी स्थानिक खबऱ्या आणि गुप्त माहितीच्या मदतीने आरोपीची ओळख आणि ठावठिकाणा शोधून काढला. स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अखेर मोहित प्रियदर्शीपर्यंत पोहचले. त्यांनी मोहितला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
३१ वर्षीय मोहित प्रियदर्शी हा आग्रा येथील रहिवासी आहे. तो एका खास विमान कंपनीत पायलट आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याने हे व्हिडिओ केवळ त्याच्या वैयक्तिक समाधानासाठी बनवले आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून लायटरसारखा दिसणारा एक स्पाय कॅमेरा जप्त केला. त्याच्या मोबाईलमध्ये ७४ वेगवेगळ्या तरुणींचे अश्लील व्हिडिओ देखील सापडले आहेत. व्हिडिओची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मोहितने हे व्हिडीओ कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकले की नाही याचा देखील तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.