Delhi School Bomb Threat Saam Tv
देश विदेश

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील शाळेला इमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी, मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी पालकांची शाळेबाहेर गर्दी

Delhi Latest News: दिल्लीतील शाळेला इमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi school Receives bomb Threat e-mail: दिल्लीतील डिफेन्स कॉलनी येथील इंडियन शाळेच्या आत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल आला होता. यानंतर पालकांना तातडीने बोलावून मुलांना घरी पाठवले जात आहे.

शाळेच्या आत बॉम्बशोधक पथकही पोहोचले आहे. यासोबतच स्थानिक पोलीसही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांचे सायबर पथक ईमेलशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी तपासात गुंतले आहे.

ईमेलद्वारे बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली

आज सकाळी 10.49 वाजता शाळेत बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. माहिती मिळाल्यानंतर शाळा रिकामी करण्यात आली असून बॉम्बशोधक पथकाकडून शाळेच्या परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. शाळेतील एका शिक्षकाने सांगितले की, या कृत्यामागे काही खोडकर मुलांचा हात असू शकतो.  (Latest Marathi News)

याआधीही घडली आहे अशी घटना

विशेष म्हणजे ही पहिलीच वेळ नसून याआधीही या शाळेत अशी घटना घडली आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी इंडियन स्कूलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने गोंधळ उडाला होता. (Delhi Latest News)

माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आणि शाळा रिकामी केल्यानंतर संपूर्ण शाळेची तपासणी करण्यात आली. यावेळी शाळेत एकही बॉम्ब सापडला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT