Mahindra & Mahindra चे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे निधन, काही दिवसांपूर्वीच झाला होता अब्जाधीशांच्या यादीत समावेश

Keshub Mahindra Passed Away: आनंद महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे निधन
Keshub Mahindra
Keshub MahindraSaam Tv
Published On

Keshub Mahindra Death News: महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे बुधवारी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. INSPACE चे अध्यक्ष पवन के गोयंका यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनाअलीकडेच फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या वार्षिक यादीत (2023) स्थान मिळालं होतं. भारतातही ते सर्वात वयस्कर अब्जाधीश होते.

केशब महिंद्रा यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. ते 1947 मध्ये महिंद्रा ग्रुपमध्ये सामील झाले आणि 1963 मध्ये कंपनीचे चेअरमन झाले. केशब महिंद्रा यांना केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह अनेक समित्यांमध्ये स्थान मिळाले आहे.

Keshub Mahindra
Karnataka assembly elections 2023: विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात दूधावरून राजकीय संघर्ष, अमूल की नंदिनी; नेमका काय आहे वाद?

केशब महिंद्रा यांनी सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआयसह विविध कंपन्यांच्या बोर्ड आणि कौन्सिलवरही काम केले आहे. 2004 ते 2010 पर्यंत केशब महिंद्रा पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषद नवी दिल्लीचे सदस्य होते. (Latest Marathi News)

केशब महिंद्रा यांनी त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात कंपनीला नव्या उंचीवर नेले. युटिलिटी वाहनांचे उत्पादन आणि विक्री वाढवण्यावर त्यांनी भर दिला. केशब महिंद्रा यांनी विलीज-जीपला लोकप्रिय करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. 1963 ते 2012 या काळात ते या ग्रुपचे अध्यक्ष होते.

Keshub Mahindra
India Corona Update: चिंता वाढली! देशात एका दिवसात 7,830 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 223 दिवसांतील हा सर्वात मोठा आकडा!

केशब महिंद्रा यांनी निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. सध्या महिंद्रा अँड महिंद्रा केवळ ट्रॅक्टर आणि एसयूव्हीसाठीच ओळखली जात नाही, तर सॉफ्टवेअर सर्व्हिस आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रांमध्येही तिचे वर्चस्व आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com